अग्गबाई सुनबाई मालिकेमध्ये वटपौर्णिमेच्या पूजेत आसावरी समोर येणार सोहमचं सत्य,तर दुसरीकडे मानसी वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 07:00 IST2021-06-22T07:00:00+5:302021-06-22T07:00:00+5:30

सासर म्हणजे कर्तव्य पण या सगळ्या भावनांना मनातून कितीही वाटलं तरी कधी मोकळी वाट मिळत नाही, होम मिनिस्टरच्या नव्या सीजनमधून याच कडू गोड आठवणींची वाट मोकळी करून देणार आहे.

Zee Marathi Vat Pornima Special Episodes | अग्गबाई सुनबाई मालिकेमध्ये वटपौर्णिमेच्या पूजेत आसावरी समोर येणार सोहमचं सत्य,तर दुसरीकडे मानसी वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करणार

अग्गबाई सुनबाई मालिकेमध्ये वटपौर्णिमेच्या पूजेत आसावरी समोर येणार सोहमचं सत्य,तर दुसरीकडे मानसी वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करणार

झी मराठीवरील मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा सौभाग्यशाली सण साजरा होणार आहे. याची सुरुवात ‘होम मिनिस्टरपासून’ होणार आहे, माहेर कितीही आवडलं तरी आपण माहेरी कायम राहू शकत नाही. माहेरवाशिणीला आपली पाऊलं सासरी परत आणावीच लागतात म्हणूंनच आपला नवा सीजन आता सासरी करणार आहोत. सासर म्हणजे कर्तव्य पण या सगळ्या भावनांना मनातून कितीही वाटलं तरी कधी मोकळी वाट मिळत नाही, होम मिनिस्टरच्या नव्या सीजनमधून याच कडू गोड आठवणींची वाट मोकळी करून देणार आहे.


‘पाहिले न मी तुला’ मध्ये मानसीने वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करू नये म्हणून समर, भोपेच्या मदतीने अनेक अडथळे आणतो. परंतु हे सगळे अडथळे पार करत मानसी हे व्रत पूर्ण करते आणि समरचा डाव फसतो.

‘अग्गबाई सुनबाई’ मध्ये वटपौर्णिमेच्या पूजेत सोहम आणि सुझेनचं सत्य आसावरीसमोर येतं, चिडून ती शुभ्राला सांगते आज पासून तू सोहमचं नाव लावायचं नाहीस. तसंच ती शुभ्राला म्हणते कि 'तुला असं का वाटलं कि मी तुझी सासू आहे, मी तुझी सासू नाही तर आई आहे, आणि तुझ्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध मी तुला नक्की न्याय मिळवून देईन.'इकडे ‘माझा होशील ना’मध्ये सई आणि गुलप्रीत मामींची पहिली वटपौर्णिमा साजरी होणार आहे.
 

Web Title: Zee Marathi Vat Pornima Special Episodes