Majhi Tujhi Reshimgath : काय फालतुगिरी आहे यार? ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नवा ट्विस्ट पाहून संतापले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 18:12 IST2022-10-27T18:11:19+5:302022-10-27T18:12:31+5:30

Majhi Tujhi Reshimgath : अनपेक्षित ट्विस्टनंतर नेहा मालिकेतून गायब होती. पण आता ती पुन्हा एकदा मालिकेत परतणार आहे. अर्थात नेहा म्हणून नाही तर अनुष्का बनून...

zee marathi serial mazi tuzi reshimgath prarthana behere share new video | Majhi Tujhi Reshimgath : काय फालतुगिरी आहे यार? ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नवा ट्विस्ट पाहून संतापले चाहते

Majhi Tujhi Reshimgath : काय फालतुगिरी आहे यार? ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नवा ट्विस्ट पाहून संतापले चाहते

‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath  ) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं.  मालिकेतील प्रार्थना बेहरे ( Prarthana Behere) व श्रेयस तळपदेची (Shreyas Talpade)  रोमॅन्टिक केमिस्ट्रीही तुफान हिट ठरली. इतकी की, ही बंद झालेली मालिका लोकांच्या आग्रहास्तव पुन्हा सुरू करण्यात आली. पण आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट  पाहायला मिळतो आहे आणि ते पाहून प्रेक्षक संतापले आहेत.  होय, यशचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि यश व नेहाचा  मोठा अपघात होतो. या अपघातात नेहा कारमधून खाली दरीत पडते. तर, यश जखमी होतो. या अनपेक्षित ट्विस्टनंतर काही दिवस नेहा मालिकेतून गायब होती. पण आता ती पुन्हा एकदा मालिकेत परतणार आहे. अर्थात नेहा म्हणून नाही तर अनुष्का बनून.

प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सेटवरचा आहे. यात प्रार्थनाचा वेगळा लुक पाहायला मिळतोय. ‘नेहा की अनुष्का’ असं तिने हा व्हिडीओ पाहून लिहिलं आहे. पण हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक काहीसे नाराज आहेत.

आम्हाला अनुष्का वगैरे नको, आम्हाला नेहाच हवी, अशा प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिल्या आहेत. नेहा... काय फालतुगिरी आहे यार, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. काहीही करा, पण परीला ओळखा, अशी कमेंटही पाहायना मिळणार आहे. प्रार्थना तू श्रेयस आणि मायरा म्हणजे नेहा, परी व यशवर्धन हे जर नसतील तर रेशीमगाठ कशी घट्ट होईल? तुझा अपघात होणं म्हणजे मूड ऑफ झाला. तुम्ही तिघेही पाहिजे परत एकत्र. सिरिअल बंद होणार म्हणून थोडं वाईट वाटलं पण परत चालू ठेवली तर असा ट्विस्ट नको होता. नेहाच पाहिजे, अशी भावना एका चाहत्याने व्यक्त केली आहे.
  

Web Title: zee marathi serial mazi tuzi reshimgath prarthana behere share new video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.