ऐकलं का? झी मराठीवर ‘बँड बाजा वरात’ हा नवा शो येणार, ‘हा’ जुना शो निरोप घेणार...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 15:22 IST2022-02-22T15:17:04+5:302022-02-22T15:22:17+5:30

Band Baja Varat Promo : प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं तर एंटरटेनमेंटचा डोस वाढवायला हवा. त्यामुळेच प्रेक्षकांचा डायरेक्ट कनेक्ट मिळवण्यासाठी झी मराठी ‘बँड बाजा वरात’ हा नवा शो घेऊन येत आहे. नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला.

zee marathi new show band baja varat come soon, He Tar Kahich Nay goes off air soon |  ऐकलं का? झी मराठीवर ‘बँड बाजा वरात’ हा नवा शो येणार, ‘हा’ जुना शो निरोप घेणार...!!

 ऐकलं का? झी मराठीवर ‘बँड बाजा वरात’ हा नवा शो येणार, ‘हा’ जुना शो निरोप घेणार...!!

 Band Baja Varat Promo : प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं म्हटल्यावर नव नवे प्रयोग करणं आलंच. टीव्ही जगतात सध्या असे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. मराठी वाहिन्याही यात मागे नाहीत. अनेक मराठी मालिका निरोप घेण्याच्या तयारीत आहेत आणि त्याजागी आगळं वेगळं देण्याचा वाहिन्यांचा प्रयत्न आहेत. झी मराठी आता असाच एक नवा कोरा आगळावेगळा शो घेऊन येतेय.

नवीन वर्षात झी मराठीच्या (ZeeMarathi) अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. काही मालिका लवकरच संपत आहे. त्यांच्या जागी नव्या मालिका येत आहेत. पण तेवढं पुरेसं नाही. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ आणि ‘देवमाणूस 2’ या मालिकेला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. अशात प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं तर एंटरटेनमेंटचा डोस वाढवायला हवा. त्यामुळेच प्रेक्षकांचा डायरेक्ट कनेक्ट मिळवण्यासाठी झी मराठी ‘बँड बाजा वरात’ ( Band Baja Varat) हा नवा शो घेऊन येत आहे. नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला.

‘बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर घरात,’ असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. या शोची कनेस्पट काय असणार याबद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. पण प्रोमोतील कलश पाहून तर लक्षात येत आहे की, ही मालिका लग्नाशीसंबंधीत आहे. 

‘या’ शोला करणार रिप्लेस

‘लोकमत फिल्मी’ला मिळालेल्या माहितीनुसार, झी मराठीवरचा ‘हे तर काहीच नाय’ ( He Tar Kahich Nay) हा शो बंद होणार असून त्याची जागा ‘बँड बाजा वरात’ हा नवा कोरा शो घेणार आहे. लग्न ठरलेल्या जोडप्यांसाठी हा शो असल्याचं कळतंय. ‘हे तर काहीच नाय’ हा शो शुक्रवार, शनिवार रात्री 9.30 वाजता टेलिकास्ट होत होता. मात्र या शोला देखील प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. अक्षया देवधर या शोचं सूत्रसंचालन करत होती. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये येऊन त्यांचे धम्माल किस्से शेअर करत होते.  

Web Title: zee marathi new show band baja varat come soon, He Tar Kahich Nay goes off air soon