Devmanus 2: तो परत आला... 'देवमाणूस २'ची पहिली झलक, डॉ. अजितकुमार पुन्हा भेटीला; पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 17:00 IST2021-11-21T16:59:25+5:302021-11-21T17:00:09+5:30

Devmanus 2: छोट्या पडद्यावर अल्पावधीतच प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवलेली 'देवमाणूस' मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देवमाणूस-२ मालिकेचा उत्कंठावर्धक प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीनं प्रदर्शित केला आहे.

Zee Marathi Famous Serial Devmanus come back with second Season First Promo of Devmanus 2 out watch video | Devmanus 2: तो परत आला... 'देवमाणूस २'ची पहिली झलक, डॉ. अजितकुमार पुन्हा भेटीला; पाहा प्रोमो

Devmanus 2: तो परत आला... 'देवमाणूस २'ची पहिली झलक, डॉ. अजितकुमार पुन्हा भेटीला; पाहा प्रोमो

Devmanus 2: छोट्या पडद्यावर अल्पावधीतच प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवलेली 'देवमाणूस' मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देवमाणूस-२ मालिकेचा उत्कंठावर्धक प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीनं प्रदर्शित केला आहे. प्रोमोमध्ये डॉ. अजितकुमार देव ही पाटी हटवण्यात आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता या मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार? डॉ. अजितकुमार देवची जागा कोण घेणार किंवा त्याच्याजागी आता नवा कलाकाल भेटीला येणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

'देवमाणूस' मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. बाबू, सरू आजी, टोण्या, डिम्पी, वंदी आत्या, नाम्या, बजा ही पात्रं नव्या मालिकेतही पाहायला मिळणार का हे पाहणं देखील उत्सुकतेचं असणार आहे. साताऱ्यातील एका छोट्याशा खेडेगावात गावकऱ्यांची फसवणूक करुन एक कंम्पाऊंडर डॉक्टर असल्याचं भासवत लोकांच्या जीवाशी खेळ करत असतो आणि गावकऱ्यांना लुबाडतो. तसंच गावातील महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करुन त्यांना जीवानिशी मारतो अशी ही डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग या बोगस डॉक्टरची कथा होती. अभिनेता किरण गायकवाड यानं अजित कुमार देवची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचं कौतुक देखील झालं होतं. 

देवमाणूस मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला तेव्हा अजितकुमार देवचं नेमकं काय होतं याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. मालिकेच्या अखेरच्या भागात अजितकुमार देव उर्फ देवी सिंग रुग्णालयात दाखल असल्याचं दाखवण्यात आलं होतं. ऑगस्ट महिन्यातच या मालिकेनं निरोप घेतला होता. पण अखेरच्या एपिसोडवरुनच प्रेक्षकांना या मालिकेचा दुसरा सीझन येणार याची कुणकुण लागली होती. अखेर चारच महिन्यात 'देवमाणूस' मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   

Web Title: Zee Marathi Famous Serial Devmanus come back with second Season First Promo of Devmanus 2 out watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.