"एक नंबर तुझी कंबर..."वर धनश्री वर्माचा अफलातून डान्स, संजू राठोडला म्हणते- "मला तुझ्यासोबत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:37 IST2025-07-08T11:37:27+5:302025-07-08T11:37:59+5:30

धनश्रीने 'एक नंबर तुझी कंबर'वर डान्स करत रील बनवला आहे. या गाण्याच्या हुक स्टेप करत धनश्रीने अफलातून डान्स केला आहे.

yuzvendra chahal ex wife dhanashree verma dance on ek no tuzi kambar song | "एक नंबर तुझी कंबर..."वर धनश्री वर्माचा अफलातून डान्स, संजू राठोडला म्हणते- "मला तुझ्यासोबत..."

"एक नंबर तुझी कंबर..."वर धनश्री वर्माचा अफलातून डान्स, संजू राठोडला म्हणते- "मला तुझ्यासोबत..."

'गुलाबी साडी' फेम संजू राठोड 'एक नंबर तुझी कंबर' या त्याच्या गाण्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संजू राठोडच्या 'एक नंबर तुझी कंबर' गाण्याने सगळ्यांना वेड लावलं आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावर रील बनवण्याचा मोह सेलिब्रिटींनाही आवरता आलेला नाही. आता सोशल मीडिया स्टार आणि युजवेंद्र चहलची एक्स पत्नी धनश्री वर्मा या गाण्यावर थिरकली आहे. 

धनश्रीने 'एक नंबर तुझी कंबर'वर डान्स करत रील बनवला आहे. या गाण्याच्या हुक स्टेप करत धनश्रीने अफलातून डान्स केला आहे. इन्स्टाग्रामवरुन धनश्रीने 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावरील रील शेअर केला आहे. एका स्टुडिओमध्ये तिने हा रील बनवला आहे. या व्हिडिओत तिने संजू राठोडला टॅग केलं आहे. "मला हे गाणं आवडलं आहे. पुढचं गाणं एकत्र करुया का?" असं तिने म्हटलं आहे. धनश्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


दरम्यान, धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. ट्रेंडिंग गाण्यावरचे रील व्हिडिओही ती शेअर करत असते. धनश्रीने २०२०मध्ये क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत लग्न करत संसार थाटला होता. पण, लग्नानंतर ५ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत. 

Web Title: yuzvendra chahal ex wife dhanashree verma dance on ek no tuzi kambar song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.