बादशाह या शो करणार आपला अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 14:24 IST2018-07-20T14:10:33+5:302018-07-20T14:24:04+5:30

रॅपस्टार बादशाह सध्या 'दिल है हिंदुस्तानी २'चे परीक्षण प्रितम आणि सुनिधी चौहान यांच्यासोबत करत असून आपला नवीन अल्बम लाँच करण्यासाठी तो सज्ज आहे.

Your album will be hosted by the King | बादशाह या शो करणार आपला अल्बम

बादशाह या शो करणार आपला अल्बम

रॅपस्टार बादशाह सध्या 'दिल है हिंदुस्तानी २'चे परीक्षण प्रितम आणि सुनिधी चौहान यांच्यासोबत करत असून आपला नवीन अल्बम लाँच करण्यासाठी तो सज्ज आहे. आपल्या नवीन गाण्याबद्दल प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमानंतर आपला सोलो अल्बम लाँच करण्यासाठी तो आणखीनच उत्सुक आहे. हे पूर्णपणे त्याचे काम असून यात २५ वेगळी गाणी आहेत. प्रत्येक गाण्याचे त्याच्या आयुष्यासोबत काही ना काही नाते असून त्याच्या नेहमीच्या गाण्यांपेक्षा ही नक्कीच वेगळी असतील.बादशाह म्हणाला, “हा अल्बम माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे ह्या मंचावर माझा अल्बम लाँच करायला मला खूप आवडेल. रॅपिंगव्यतिरिक्त मला गाणी लिहायला आणि गायलासुद्धा आवडतात. ह्या अल्बमची संकल्पना मला खूप जवळची असून हा ह्या वर्षातील माझ्या सर्वांत मोठ्‌या प्रोजेक्ट्‌सपैकी एक आहे. मी खूप उत्साहात आणि थोडा नर्व्हसही आहे. ह्या अल्बमवर मी खूप काळापासून काम करत आहे. माझ्या ह्या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रेक्षकांचा मी आभारी आहे.”

स्टारप्लसवरील 'दिल है हिंदुस्तानी २' जगभरातील सर्व हिंदु हृदयांना एकत्र आणतो. ह्या शोमध्ये लोकप्रिय भारतीय गाणी साजरी केली जातील. प्रत्येक स्पर्धक ह्या गाण्यांना आपला असा खास स्पर्श प्रदान करेल आणि पारंपारिक व आधुनिक संगीताचा अनोखा मिलाफ साधला जाईल.

Web Title: Your album will be hosted by the King

टॅग्स :Badshahबादशहा