"हिरो आहेस रे तू आपला...", लतिकाच्या अभिमन्यूला वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 10:47 AM2023-11-20T10:47:32+5:302023-11-20T10:48:01+5:30

Sameer Paranjape And Akshaya Naik : समीर परांजपेच्या वाढदिवसानिमित्त अक्षया नाईकने हटके पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

"You are a hero, you are...", Latika wishes Abhimanyu on his birthday!! | "हिरो आहेस रे तू आपला...", लतिकाच्या अभिमन्यूला वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा!!

"हिरो आहेस रे तू आपला...", लतिकाच्या अभिमन्यूला वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा!!

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका सुंदरा मनामध्ये भरली(Sundra Manamadhye Bharli)ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही मालिकेतील पात्र रसिकांच्या मनात घर करुन कायम आहेत. या मालिकेत लतिकाची भूमिका अभिनेत्री अक्षया नाईक(Akshaya Naik)ने साकारली होती आणि अभिमन्यूची भूमिका समीर परांजपे(Sameer Paranjape)ने. दरम्यान समीर परांजपेच्या वाढदिवसानिमित्त अक्षया नाईकने हटके पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षयाने समीरसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, या भोळ्या चेहऱ्यामागचा सैतान फक्त मला माहित आहे याचा अभिमान बाळगू की माझं दूर्दैव समजू हे मला कधीच कळलं नाही. मित्र म्हणून तू मला जितका त्रास देतोस, त्याची भरपाई तू तुझ्या उत्तम अभिनयातून आणि आता गायकीतून करतोयस. मित्र म्हणून तुला बघता क्षणी जितक्या शिव्या येतात तोंडात, तितकाच अभिमान वाटतो मला तुझी कला सादर करताना पाहून. हिरो आहेस रे तू आपला.

तिने पुढे म्हटले की, माझे सगळे लाड पुरवण्यासाठी थँक्य यू म्हणणार नाही. तुझी जास्तीची जबाबदारी आहे असं समज, आणि तू जरुर कर. तसेच, करण जोहर तुझ्या बातम्यांसह वाट पाहत आहे. हॅप्पी बर्थडे चुडू. चुडू टू माय टुडी

वर्कफ्रंट..
अक्षया नाईकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर मालिकेनंतर तिचं नवीन नाटक रंगभूमीवर दाखल झाले. या नाटकाचं नाव आहे चुकभूल द्यावी घ्यावी.  या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच जय जय स्वामी समर्थ फेम अभिनेता अक्षय मुडावदकर आणि अक्षया नाईक ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. तर समीर परांजपेबद्दल सांगायचं तर तो 'सूर नवा ध्यास नवा' या रिएलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून पाहायला मिळतो आहे. 

Web Title: "You are a hero, you are...", Latika wishes Abhimanyu on his birthday!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.