"तो सोन्यासारखा आहे"; बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यावर योगिता चव्हाणकडून सूरजचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 10:52 IST2024-08-20T10:51:37+5:302024-08-20T10:52:06+5:30

गोलिगत धोका फेम सूरजचं योगिता चव्हाणकडून खूप कौतुक. सूरजचा खरा स्वभाव कसा आहे, हे योगिताने सांगितलं (suraj chavan, bigg boss marathi 5)

yogita chavan praised suraj chavan in bigg boss marathi 5 | "तो सोन्यासारखा आहे"; बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यावर योगिता चव्हाणकडून सूरजचं कौतुक

"तो सोन्यासारखा आहे"; बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यावर योगिता चव्हाणकडून सूरजचं कौतुक

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून या आठवड्यात योगिता चव्हाण घराबाहेर आली. तिसऱ्या आठवड्यात चांगला खेळ खेळूनही कमी मतं मिळाल्याने योगिता चव्हाणला घराबाहेर यावं लागलं. योगिताचं एविक्शन सर्वांसाठी शॉकिंग होतं. योगिताने अंकिताला कॅप्टनसी जिंकण्यासाठी चांगलीच मदत केली होती. याशिवाय तिसऱ्या आठवड्यात ती निक्कीला भिडली होती. ज्यामुळे तिचं रितेशने कौतुकही केलं. घराबाहेर आल्यावर योगिताने सूरज चव्हाणचं आवर्जुन कौतुक केलं.

योगिताने सूरज चव्हाणचं केलं कौतुक

योगिताने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला. योगिता म्हणाली, "खूप गोड आहे तो मुलगा. त्याला जे काही प्रेम मिळतंय ते सगळं तो डिझर्व्ह करतो. खूप चांगल्या प्लॅटफॉर्मवर तो आलाय. त्याच्या पर्सनल लाईफमध्ये त्याने खूप स्ट्रगल पाहिलाय. तो खूप छान माणूस आहे. तो सोन्यासारखा आहे. तो खूप चांगला आहे. त्याचं खूप भलं व्हावं आयुष्यात अशी माझी इच्छा आहे. आता बाहेर आल्यावर आम्ही सगळेच त्याला भेटू."


 


सूरजने खूप पुढे जावं आयुष्यात: योगिता

योगिता पुढे म्हणाली, "आतापर्यंत त्याच्या आयुष्यात तसे मित्र - मैत्रिणी नव्हते जे त्याला व्यवस्थित गाईड करतील. पण आता अंकिता, मी,  DP दादा आणि पॅडी दादा आहे. त्यामुळे त्याचं पुढचं आयुष्य छान असेल याची मला खात्री आहे. खूप छान मुलगा आहे. त्याने पुढं जावं आयुष्यात." अशा शब्दात योगिताने सूरजवर कौतुकाचा वर्षाव केला. सूरज चव्हाणने तिसरा आठवडा गाजवला. त्याने अरबाजला टक्कर दिली, अशा शब्दांमध्ये रितेशने भाऊच्या धक्क्यावर सूरजचं चांगलंच कौतुक केलं.

Web Title: yogita chavan praised suraj chavan in bigg boss marathi 5