योगिता बिहानी एकता कपूरच्या ‘दिल ही तो है’ मध्ये साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 11:50 IST2018-05-09T06:20:19+5:302018-05-09T11:50:19+5:30
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील एकता कपूरच्या दिल ही तो है या आगामी मालिकेची नायिका कोण असणार याबाबत अनेक चर्चा आणि ...

योगिता बिहानी एकता कपूरच्या ‘दिल ही तो है’ मध्ये साकारणार ही भूमिका
स नी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील एकता कपूरच्या दिल ही तो है या आगामी मालिकेची नायिका कोण असणार याबाबत अनेक चर्चा आणि अंदाज बांधले जात होते. ही प्रतीक्षा आता संपली असून मालिकेत पलक शर्मा या मुख्य व्यक्तिरेखेसाठी योगिता बिहाणीची निवड करण्यात आली आहे. योगिताने काही जाहिराती आणि रिअॅलिटी कुकिंग शो केलेले आहेत. अलीकडे ती ‘दस का दम’ च्या एका प्रोमोमध्ये दमदार सलमान खानसोबत दिसली होती. एकता कपूरने या मालिकेची घोषणा केल्यापासून दिल ही तो है मालिका चर्चेचा विषय बनली आहे. योगिता या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बालाजी टेलिफ्लिम्ससारख्या मोठ्या बॅनरसोबत काम करण्यास ती खूप उत्सुक आहे. या मालिकेविषयी योगिता सांगते, “ ही मालिका मिळाल्यामुळे माझे स्वप्नच
जणू साकार झाले आहे असे मला वाटायला लागले आहे. सलमानसोबत प्रोमो आणि आता भारतीय टेलिव्हिजनची साम्राज्ञी एकता कपूरच्या मालिकेत भूमिका साकारायला मिळत असल्याने योगिता प्रचंड खूश आहे. यापेक्षा आयुष्यात चांगले काही होऊ शकते असे मला वाटतच नाही .कोणत्याही नवीन कलाकारासाठी एकता कपूरच्या मालिकेत काम मिळणे हा सगळ्यात मोठा मंच असतो. मी खूप उत्साहित आहे त्याचबरोबर थोडी काळजी देखील वाटते आहे. मी काही काळापासून अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्यासाठी हा दुहेरी धमाका आहे. पलक ही एक आनंदी आणि ठाम स्त्रीवादी मते असणारी व्यक्ती आहे. मी चित्रीकरण सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहते आहे आणि मला आशा वाटते की प्रेक्षकांना देखील माझे काम आवडेल.”
करण जोहरने दिग्दर्शित केलेला कभी खुशी कभी गम प्रेक्षकांना आता मालिकेच्या रूपात पाहायला मिळणार आहे. दिल ही तो है असे या मालिकेचे नाव असून छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार या मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. योगिता बिहानीची भूमिका काजोलच्या भूमिकेशी मिळतीजुळती असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत आतापर्यंत गितांजली टिकेकर, फरीदा दादी, ओंकार कपूर या कलाकारांची वर्णी लागली आहे.
Also Read : ‘दिल ही तो है’ मध्ये फरीदा दादी साकारणार कभी खुशी कभी गम या चित्रपटातील या पात्राशी सार्धम्य असलेली व्यक्तिरेखा