'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट, आता या अभिनेत्याची होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 13:30 IST2023-11-06T13:25:22+5:302023-11-06T13:30:07+5:30

बयोच्या नव्या प्रवासात डॉ. विशाल पाटील या नवीन व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे.

Yogesh sohoni will make a entry in chotya bayochi mothi swapna marathi serial | 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट, आता या अभिनेत्याची होणार एंट्री

'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट, आता या अभिनेत्याची होणार एंट्री

बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' ही सोनी मराठीवरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता कुठे मुंबईच्या धावत्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली आहे. कुणाच्याही मदतीशिवाय डॉक्टर बनण्याचं आपलं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या बयोला आता आणखी कुठल्या-कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, हे हळूहळू कळेलच. तत्पूर्वी बयोच्या या नव्या प्रवासात डॉ. विशाल पाटील या नवीन व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे. डॉ. विशाल पाटीलच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता योगेश सोहोनी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 घराघरांत पोहोचलेला योगेश सोहोनी हा गोड चेहरा 'छोट्या बयोची मोठी गोष्ट' या मालिकेतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही. योगेशने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा डॉ. विशाल ही व्यक्तिरेखा काहीशी वेगळी असून योगेश या भूमिकेला नक्कीच न्याय देईल. डॉ. विशाल पाटील  याचा प्रवेश मालिकेला कोणता नवं वळण देईल..? डॉ. विशाल बयोला, तिच्या स्वप्नांना समजून घेऊ शकेल का..? बयोच्या प्रवासात डॉ. विशाल तिला मदत करतो का..? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील.

Web Title: Yogesh sohoni will make a entry in chotya bayochi mothi swapna marathi serial