सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी 2’ फेम शिव ठाकरेच्या ‘शीलावती’ची चर्चा ; पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 08:00 AM2021-08-06T08:00:00+5:302021-08-06T08:00:02+5:30

Shilavati : ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता शिव ठाकरे सध्या ‘विनी’मुळे नाही तर ‘शीलावती’मुळे चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर शिवच्या ‘शीलावती’ची जोरदार चर्चा आहे.

yeu kashi tashi mi nandyala fame momo aka mira jagganath and shiv thakre to star in shilavati | सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी 2’ फेम शिव ठाकरेच्या ‘शीलावती’ची चर्चा ; पाहून व्हाल अवाक्

सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी 2’ फेम शिव ठाकरेच्या ‘शीलावती’ची चर्चा ; पाहून व्हाल अवाक्

googlenewsNext
ठळक मुद्देमीरा जग्गनाथबद्दल सांगायचे तर सध्या ती झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मोमोची भूमिका साकारतेय.

‘बिग बॉस मराठी 2’चा  (Big Boss Marathi 2) विजेता शिव ठाकरे  (Shiv Thackrey) सध्या ‘विनी’मुळे नाही तर ‘शीलावती’मुळे (Shilavati) चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर शिवच्या ‘शीलावती’ची जोरदार चर्चा आहे. आता या ‘शीलावती’ची काय भानगड असा प्रश्न तुम्हाला पडला असे तर हा आहे एक व्हिडीओ अल्बम. होय, ‘शीलावती’ नावाचे शिव ठाकरेचे नवे गाणे आज रिलीज झालेय. नुकताच याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता.
 शिव सोबत ‘शीलावती’मध्ये (Shilavati)  मोमो दिसणार आहे. होय, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील मोमोची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Mira Jagganath) या अल्बममध्ये दिसणार आहे.  

 या गाण्यात मीराचा सुपर हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तर शिव नेहमीप्रमाणेच चार्मिंग लुकमध्ये दिसत आहे.   दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली आहे.  
 ‘बिग बॉस मराठी 2’ने शिव फारच चर्चेत आला होता. या शोमधील त्याची अन् वीणा जगतापची केमिस्ट्रीही चर्चेचा विषय ठरली होती. ‘बिग बॉस मराठी 2’ शो जिंकल्यानंतरही अनेकदिवस शिव व वीणाची चर्चा होती. ‘बिग बॉस मराठी 2’आधी शिव एम टीव्ही वरील रोडिज् या शोमध्ये दिसला होता.  

मीरा जग्गनाथबद्दल सांगायचे तर सध्या ती झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मोमोची भूमिका साकारतेय. हे पात्र सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलंय. तिचा ग्लॅमरस आणि विनोदी अंदाज चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील मोमो चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती रोज नवे फोटो शेअर करत असते. या फोटोत तिच्या बोल्ड अंदाजाची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Web Title: yeu kashi tashi mi nandyala fame momo aka mira jagganath and shiv thakre to star in shilavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.