Shocking! येऊ कशी तशी मी नांदायला फेम आदिती सारंगधर घेणार निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 14:07 IST2021-06-23T14:05:14+5:302021-06-23T14:07:10+5:30
आदितेने साकारलेली खलनायिकेची भूमिका तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडत आहे.

Shocking! येऊ कशी तशी मी नांदायला फेम आदिती सारंगधर घेणार निरोप
येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तसेच या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. स्वीटू आणि ओमची प्रेमकथा आपल्याला येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत पाहायला मिळत आहे. स्वीटू ही गरीब आहे तर ओम हा अतिशय श्रीमंत आहे. ओम नेहमीच स्वीटूच्या प्रत्येक समस्येत तिच्या पाठिशी उभा राहातो. पण स्वीटू आणि ओमची ही मैत्री ओमच्या बहिणीला म्हणजेच मालविकाला अजिबातच आवडत नाही.
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत आपल्याला मालविकाच्या भूमिकेत आदिती सारंगधरला पाहायला मिळत आहे. आदितेने साकारलेली खलनायिकेची भूमिका तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना अगदी खराखुरा वाटत असल्याने तिला सोशल मीडियावर लोक चांगलेच सुनावत आहेत. स्वीटू आणि ओमच्या लव्हस्टोरीतील ती व्हिलन असल्याचे तिला नेहमीच लोक ऐकवतात. पण आता या सगळ्या गोष्टीला आदिती कंटाळली असून तिेने सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आदितीचे सोशल मीडियावरील अकाऊंट सध्या सुरू असले तरी ती काही काळांचा ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात आहे. सततच्या ट्रोलिंगला कंटाळून तिने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.