'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटूच्या सासऱ्यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी देखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 18:26 IST2022-02-11T18:25:40+5:302022-02-11T18:26:07+5:30

Yeu Kashi Tashi Mi Nandayla :स्वीटूच्या सासऱ्यांची भूमिका अभिनेते मिलिंद जोशी (Milind Joshi) यांनी साकारली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, मिलिंद जोशी यांची पत्नीदेखील अभिनेत्री आहे.

'Yeu Kashi Tashi Mi Nandayla fame Sweetu's father-in-law's real life wife also an actress | 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटूच्या सासऱ्यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी देखील आहे अभिनेत्री

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटूच्या सासऱ्यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी देखील आहे अभिनेत्री

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायलामधील स्वीटू आणि ओमची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत स्वीटू आणि ओम शिवाय इतर पात्रांनी देखील रसिकांच्या मनात घर केले आहे. दरम्यान या मालिकेत स्वीटूच्या सासऱ्यांची भूमिका अभिनेते मिलिंद जोशी यांनी साकारली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, मिलिंद जोशी यांची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. त्यांच्या पत्नीचं नाव अल्पा जोशी आहे. 

अभिनेत्री अल्पा जोशी यांनी हिंदी मालिकेत विविध भूमिका केल्या आहेत. हिंदी मालिकेतील सासू, आई, काकी, भाभी अशा सोज्वळ तर कधी दुधात मीठाचा खडा टाकणारया खलनायिकेची व्यक्तीरेखाही अल्पा यांनी साकारल्या आहेत. मराठी, हिंदी व गुजराती सिनेमा, नाटक व मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. 


 गुजराती कुटुंबात जन्म झालेल्या अल्पा यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. ससुराल सिमर का, कितनी मोहब्बत है या मालिकेत अल्पा यांनी अभिनयातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या शिवाय त्यांनी काही गुजराती व्यावसायिक व प्रायोगिक नाटकातही काम केले आहे. एका हिंदी मालिकेच्या निमित्ताने मिलिंद आणि अल्पा यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.


अल्पा या हिंदी व गुजराती टीव्ही जगतात काम करतात तर मिलिंद हे हिंदी गुजरातीसह मराठी मालिका व वेबसिरीजमध्येही अभिनय करताना दिसतात. सध्या मिलिंद जोशी यांची येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सुरू आहे. काही दिवसात या मालिकेचा शेवट होणार असला तरी गेल्या वर्षीपासून ही मालिका लोकप्रिय ठरली होती. 
 

Web Title: 'Yeu Kashi Tashi Mi Nandayla fame Sweetu's father-in-law's real life wife also an actress