‘येऊ तशी कशी मी नांदायला’ मधील मालविकाच्या खऱ्या आयुष्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 12:19 IST2021-07-28T12:13:39+5:302021-07-28T12:19:48+5:30

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत जरी माझी भूमिका नकारात्मक असली तरीही त्यातून शिकण्यासारखं बरच काही आहे. 'घरातल्या व्यक्तींशी कसं वागू नये' हे दाखवण्याचं काम मालविकाने केलं आहे.

Yeu Kashi Tashi Me Nandayla Malvika Aka Aditi SarangDhar Personal Life Unknown Facts | ‘येऊ तशी कशी मी नांदायला’ मधील मालविकाच्या खऱ्या आयुष्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

‘येऊ तशी कशी मी नांदायला’ मधील मालविकाच्या खऱ्या आयुष्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

 'येऊ कशी तशी मी नांदायला' या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवाती पासूनच पसंती दर्शवली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेवरच नाही तर त्यातील व्यक्तिरेखांवर देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. शकू, नलू, ओम, स्वीटू, चिन्या, रॉकी आणि मालिकेतील सर्व पात्र ही प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतात.इतकंच काय तर या मालिकेतील खलनायिका म्हणजेच मालविका या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे.मालविकाची व्यक्तिरेखा अभिनेत्री अदिती सारंगधर अगदी चोख साकारतेय. तिला यासाठी प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद देखील मिळतोय. 

मालविका साकरताना तिने सांगितले होते की, "माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका निभावतेय. नकारात्मक भूमिकाच करायची आहे असं मी ठरवलं नव्हतं. पण कुटुंबासाठी वेळ आणि चित्रीकरणाचे तास हे गणित जुळवून काम करण्याची इच्छा होती. सुरुवातीला मालविकाचं पात्र साकारताना मला अक्षरशः रडू यायचं. कारण अशा प्रवृत्तीची माणसं मी माझ्या आजूबाजूला कधी पाहिली नाहीत. पण हळू हळू ते पात्र मी समजू लागले.

मालविका ही एक कणखर आणि बेधडक व्यक्ती आहे. मालिकेत जरी माझी भूमिका नकारात्मक असली तरीही त्यातून शिकण्यासारखं बरच काही आहे. 'घरातल्या व्यक्तींशी कसं वागू नये' हे दाखवण्याचं काम मालविकाने केलं आहे. आता मला हे पात्र साकारताना खूप मजा येते. प्रेक्षक मालविकाचा जितका तिरस्कार करतात, तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त मालविकाचं कौतुक करतात."

रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये मालविका साकारणारी अदिती सारंगधर कशी आहे तिच्याविषयी जाणून घेण्यातही रसिकांना उत्सुकता असते. २००९ मध्ये आलेली तिची ‘वादळवाट’ ही तिची पहिली मालिकाही प्रचंड गाजली होती.  'दामिनी' आणि ‘लक्ष्य’ या मालिकेतही काम केले.या मालिकेमुळे अदिती  घराघरात पोचली. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत गेली.

 

मालिकेव्यतिरिक्त  ‘ती रात्र’ हा तिचा पहिला सिनमा. ‘होऊ दे जरासा उशीर’ यामध्येही ती झळकली आहे. आदितीने २५ मे २०१३मध्ये सुहास रेवंडेकर बरोबर लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. अदिती आणि सुहास यांचेही लव्हमॅरेज आहे.या  कपलला  एक मुलगाही आहे ज्याचे नाव अरीन आहे. 

Web Title: Yeu Kashi Tashi Me Nandayla Malvika Aka Aditi SarangDhar Personal Life Unknown Facts