येळकोट येळकोट जय मल्हार! लग्नानंतर प्राजक्ता गायकवाडने पतीसह घेतलं जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 09:33 IST2025-12-04T09:32:52+5:302025-12-04T09:33:37+5:30
Prajakta Gaikwad : प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुडवड लग्नानंतर जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते. परंपरेनुसार, शंभुराजने प्राजक्ताला उचलून जेजुरी गड चढला. त्यानंतर दोघांनी खंडेरायाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

येळकोट येळकोट जय मल्हार! लग्नानंतर प्राजक्ता गायकवाडने पतीसह घेतलं जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड खुटवड घराण्याची सून झाली आहे. २ डिसेंबर रोजी प्राजक्ता आणि शंभुराज यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयल होत आहेत. दरम्यान आता लग्नानंतर त्यांनी ३ डिसेंबरला जेजुरी येथील खंडोबाचं दर्शन घेतलं. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुडवड लग्नानंतर जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते. परंपरेनुसार, शंभुराजने प्राजक्ताला उचलून जेजुरी गड चढला. त्यानंतर दोघांनी खंडेरायाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी भंडाऱ्याची उधळणही केली. यावेळी प्राजक्ताने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर शंभुराजने व्हाइट रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. त्यांचा खंडोबाच्या मंदिरातील व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता गायकवाड मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. या मालिकेतून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याशिवाय तिने इतर काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता प्राजक्ताने शंभुराजसोबत लग्न करून तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.