ये उन दिनों की बात है या मालिकेतील कलाकार थिरकणार या गाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:21 IST2018-08-21T15:20:35+5:302018-08-21T15:21:50+5:30

90च्या दशकाची आठवण देणार्‍या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ये उन दिनों की बात है मालिकेत आता समीर आणि नैनाचा एक खास प्रवास सुरू होत आहे. ही जोडी आता छोट्या पडद्यावर ‘तोहफा तोहफा’ गाण्याची जादू निर्माण करणार आहेत.

yeh un dinon ki baat hai team dance on Tohfa tohfa dance number | ये उन दिनों की बात है या मालिकेतील कलाकार थिरकणार या गाण्यावर

ये उन दिनों की बात है या मालिकेतील कलाकार थिरकणार या गाण्यावर

90च्या दशकाच्या सुवर्ण काळाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा मिळवली आहे. या काळात लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांनी पडद्यावर आपला ठसा उमटवला होता. त्यांचा परफॉर्मन्स अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. गत काळातील बॉलिवूड युगुलांमधील केमिस्ट्रीने देशभरातील प्रेक्षकांना प्रभावित केलेले आहे. प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी अशीच एक जोडी होती जितेंद्र आणि जया प्रदा यांची. त्यांच्या ‘तोहफा तोहफा लाया लाया’ या गाण्याची खूप प्रशंसा झाली होती आणि त्यांनी सिनेजगतात आपली एक जादू निर्माण केली होती.
 
90च्या दशकाची आठवण देणार्‍या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ये उन दिनों की बात है मालिकेत आता समीर आणि नैनाचा एक खास प्रवास सुरू होत आहे. ही जोडी आता छोट्या पडद्यावर ‘तोहफा तोहफा’ गाण्याची जादू निर्माण करणार आहेत. ज्या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना भूतकाळाच्या आठवणींत गुंतवून ठेवले आहे, त्यात आता एक ग्लॅमरस भाग सुरू होणार आहे, ज्यात समीर आणि नैना गतकाळातील चित्रपटांतील क्षण जगणार आहेत. प्रेक्षकांनी अलीकडेच समीर आणि नैनाच्या प्रेमभंगाचे नाट्य अनुभवले आहे. आता त्यांच्यातील दुरावा दूर होणार असून त्यांच्या प्रेमाला एक वळण मिळणार आहे. केशरी आणि सोनेरी भरतकाम केलेला लहंगा आणि केशरी रंगाची चोळी आणि त्यावर जया प्रदासारखे दागिने घालून नैना ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदाची आठवण ताजी करणार आहे. याबाबत आशी सिंहला विचारले असता तिने सांगितले, “मला जेव्हा समजले की, आम्ही ‘तोहफा तोहफा लाया लाया’ हे 90च्या दशकातील गाजलेले गाणे पडद्यावर साकारणार आहोत, तेव्हा मी खूपच रोमांचित झाले होते. जितेंद्र-जया प्रदा या जोडीवर चित्रित झालेल्या गाण्यांपैकी हे माझे आवडते गाणे आहे. या गाण्याच्या चित्रीकरणापूर्वी मी ते गाणे पुन्हा पुन्हा बघितले, जेणे करून त्यातील हावभाव आणि नृत्याच्या स्टेप जशाच्या तशा करता याव्यात. हा खूप छान अनुभव होता आणि रणदीपला आणि मला त्यात खूप मजा आली. चित्रीकरणाची जागा देखील चित्रपटातील गाण्याप्रमाणेच सजवण्यात आली होती, त्यामुळे आम्ही तेथे खूप फोटो काढले. मला खात्री आहे की प्रेक्षकांना आमचा हा परफॉर्मन्स खूप आवडेल.”

Web Title: yeh un dinon ki baat hai team dance on Tohfa tohfa dance number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.