टीव्ही अभिनेता समीर शर्माची आत्महत्या; पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 13:07 IST2020-08-06T13:00:46+5:302020-08-06T13:07:17+5:30
टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ, दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय

टीव्ही अभिनेता समीर शर्माची आत्महत्या; पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
टीव्ही अभिनेता आणि मॉडेल समीर शर्मा याने कथितरित्या आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. बुधवारी रात्री मुंबईतील आपल्या घरी समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 44 वर्षांच्या समीरने आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. अर्थात त्याच्या घरातून कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही.
मलाड वेस्ट भागातील अहिंसा मार्गावरील नेहा सीएचएस बिल्डींगमध्ये समीर राहत होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात समीरने हे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. घरातून दुर्गंधी येत असल्याने सोसायटीतील लोकांना संशय आला. यानंतर या घटनेचा खुलासा झाला.
समीरने अनेक मालिकांमध्ये काम केलेय. कहानी घर घर की, क्यों की सांस भी कभी बहू थी, इस प्यार को क्या नाम दूं-एक बार फिर, ज्योती अशा अनेक मालिकांमध्ये तो दिसला होता.
दोन दिवसांपूर्वीच केली आत्महत्या?
समीरच्या मृतदेहाची अवस्था बघता समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.