"ये रिश्ते हैं प्यार के" मालिकेने घेतली ३ महिन्यांची झेप, मालिकेत करण्यात आले असे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 06:30 IST2019-11-25T06:30:00+5:302019-11-25T06:30:00+5:30

नेहमीप्रमाणे मालिकेतल्या सुनेसारखा होता पण आता त्यांचा लुकमध्ये बदल झाल्यामुळे आता खूपच स्टायलिश आणि पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसत आहे.

Yeh Rishte Hai Pyaar Ke Serieal took six months Leap Period | "ये रिश्ते हैं प्यार के" मालिकेने घेतली ३ महिन्यांची झेप, मालिकेत करण्यात आले असे बदल

"ये रिश्ते हैं प्यार के" मालिकेने घेतली ३ महिन्यांची झेप, मालिकेत करण्यात आले असे बदल

 टीआरपी रेटिंगमध्ये उच्च स्थान मिळवणारा लोकप्रिय शो "ये रिश्ते हैं प्यार के" पासून आपण निधी राजवंशला ओळखतोय. मालिकेतील प्रत्येक पात्रांनी खूप कठीण परिश्रमने ह्या मालिकेला रसिकांची पसंती मिळवण्यात यश मिळाले. आता ही मालिका रंजक वळणावर पोहचली आहे.  मालिकेने ३ महिन्याच्या झेप घेतल्यामुळे एक नवीन ट्विस्ट सुद्धा येणार आहे आणि त्यानुसार सर्व पात्रांमध्ये बदल सुद्धा करण्यातल आले आहेत. 


संगीता कापुरे उर्फ निधी राजवंश अबीरची  'मामी' या भूमिकेत दिसत आहे. तिच्या विनोदी भूमिकेमुळे आणि विनोदी स्वभावामुळे ती प्रेक्षकांना आवडते. संगीताच्या लूकमध्येसुद्धा बराच बदल करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे मालिकेतल्या सुनेसारखा होता पण आता त्यांचा लुकमध्ये बदल झाल्यामुळे आता खूपच स्टायलिश आणि पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये संगीताने केशरी रंगाची साडी परिधान केल्याचे पाहायला मिळते आहे. या साडीत ती अधिक सुंदर दिसत आहे.


तिच्या आधीच्या लूकच्या तुलनेत संगीताची हेअरस्टाईलही बदलली आहे. या टेलिव्हिजन कार्यक्रमातील संगीताचा एकंदर लूक या पात्राच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणत आहे. लवकरच आपल्याला मालिकेतल्या नवीन ट्विस्ट बद्दल माहिती समोर येणार आहे.
 

Web Title: Yeh Rishte Hai Pyaar Ke Serieal took six months Leap Period