‘ये है मोहब्बते’चे कलाकार पोहोचले या हिल स्टेशनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 13:19 IST2018-08-23T13:13:37+5:302018-08-23T13:19:05+5:30

या मालिकेतील एका आगामी भागात ज्यात परमने पिहूचे अपहरण केले आहे, असे दिसते, त्याच्या चित्रीकरणासाठी दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल, रुहानिका धवन आणि अन्य कलाकार पाचगणीला गेले आहेत.

'Ye hai Mohabbate' artist arrived at Hill Station | ‘ये है मोहब्बते’चे कलाकार पोहोचले या हिल स्टेशनला

‘ये है मोहब्बते’चे कलाकार पोहोचले या हिल स्टेशनला

ठळक मुद्देये है मोहोब्बते ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

मान्सूनचा ऋतू संपण्यापूर्वी महाबळेश्वरलगतच्या पाचगणी या हिल स्टेशनला भेट देणे आवश्यक आहे. एखाद्या वीकेण्डला कोसळत्या पावसाच्या धारांमध्ये चित्रीकरण करण्यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी काय असणार! ‘स्टार प्लस’वरीलये है मोहब्बतें’ या लोकप्रिय मालिकेचे कलाकार आणि कर्मचारी या हिरव्याकंच आणि ओलेत्या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी निघाले आहेत.

या मालिकेतील एका आगामी भागात ज्यात परमने पिहूचे अपहरण केले आहे, असे दिसते, त्याच्या चित्रीकरणासाठी दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल, रुहानिका धवन आणि अन्य कलाकार पाचगणीला गेले आहेत. पिहूच्या अपहरणामुळे सैरभैर झालेले रमण आणि इशिता भल्ला हे तिचा शोध घेत डोंगरात फिरत असतात. पण यावेळी आणखी एक आपत्ती कोसळते. हे दोघेही एका अंधाऱ्या गुहेत फसतात. हा प्रसंग वास्तव वाटावा, यासाठी खऱ्या गुहेचा वापर करण्यात आला आहे. पाचगणी परिसरात अशा गुहा आहेत. हे कलाकार आणि कर्मचारी केवळ चित्रीकरणासाठी पाचगणीला आलेले नाहीत. चित्रीकरणाचे काम आटोपल्यावर ते पाचगणीतच विश्रांती घेऊन कामाचा ताण हलका करीत या हिल स्टेशनचा आनंद लुटणार आहेत.

ये है मोहोब्बते ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील रमण आणि इशिताची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तसेच या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. 

 

Web Title: 'Ye hai Mohabbate' artist arrived at Hill Station