नागिणच्या सेटवर अभिनेत्रींची धमाल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 17:03 IST2018-06-04T11:33:21+5:302018-06-04T17:03:21+5:30

कलर्सच्या नागिण 3 मध्ये शक्ती, पॅशन आणि सूडाची गाथा  सांगितलेली आहे. ही मालिका  2 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतेच, ...

Wonderful actresses on the sets of the cast | नागिणच्या सेटवर अभिनेत्रींची धमाल मस्ती

नागिणच्या सेटवर अभिनेत्रींची धमाल मस्ती

र्सच्या नागिण 3 मध्ये शक्ती, पॅशन आणि सूडाची गाथा  सांगितलेली आहे. ही मालिका  2 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतेच, 'वीरे दी वेडिंग'च्या अभिनेत्री करीना कपूर खान, सोनम कपूर आहुजा, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांनी मालिकेच्या कलाकारांसोबत एका विशेष भागाचे चित्रीकरण केले.

याचारही अभिनेत्रींना मालिकेचे आणि त्याच्या कथेचे खूप आकर्षण वाटत होते आणि त्या नागिनीसारखी पोझ देणे आणि आवाज काढणे टाळू शकल्या नाहीत. सेटवरील एका सूत्राने सांगितले की, संपूर्ण कलाकारांची या अभिनेत्रींमुळे अतिशय करमणूक झाली कारण त्या सतत नागिनीसारखी पोज देऊन फोटो आणि व्हिडिओ काढत होत्या. त्यांनी स्वतःही त्याचा खूप आनंद लुटला आणि इतरांसोबत फोटो काढून तो सोशल मिडियावर टाकण्यात त्या मग्न होत्या.

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाने केवळ दोनच दिवसामध्ये बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे.कारण चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापेक्षाही दुसºया दिवशी अधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट आगामी काळात बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देईल असेच काहीसे चित्र आहे. वीरे दी वेडिंग’च्या निर्मितीसाठी सुमारे ३० कोटी इतका खर्च आला आहे. अशात दुसºयाच दिवशी चित्रपटाने मुसंडी मारल्याने निर्मितीचा खर्च जवळपास वसूल झाल्यासारखा आहे. दरम्यान, चित्रपटाने ओपनिंग डेला म्हणजेच शुक्रवारी १०.७० कोटी रुपयांची कमाई केली. तर शनिवारी आणखी मजल मारताना १२.२५ कोटींचा गल्ला जमविला. अशात चित्रपटाने दोनच दिवसात २२.९५ कोटी रुपये कमाविले आहेत. सुरुवातीला असा अंदाज वर्तविला जात होता की, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकणार नाही. परंतु हे सर्व अंदाज मोडीत काढत चित्रपटाने दमदार सुरुवात केली आहे

Web Title: Wonderful actresses on the sets of the cast