"अल्पावधीतच अश्विनीला सर्वांनी 'तू चाल पुढं' म्हणत आपलंसं करून घेतलं", अश्विनी फेम दीपा चौधरीची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 08:58 IST2023-08-16T08:57:33+5:302023-08-16T08:58:04+5:30

Tu chaal Pudha : 'तू चाल पुढं' मालिकेला १५ ऑगस्ट रोजी १ वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्यानिमित्ताने दीपाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Within a short time, Ashwini was loved by everyone by saying 'Tu chaal Pudha', Ashwini fame Deepa Chaudhary's special post | "अल्पावधीतच अश्विनीला सर्वांनी 'तू चाल पुढं' म्हणत आपलंसं करून घेतलं", अश्विनी फेम दीपा चौधरीची खास पोस्ट

"अल्पावधीतच अश्विनीला सर्वांनी 'तू चाल पुढं' म्हणत आपलंसं करून घेतलं", अश्विनी फेम दीपा चौधरीची खास पोस्ट

झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेत अश्विनीचा गृहिणी ते उद्योजिका असा यशस्वी प्रवास रेखाटण्यात आला आहे. या मालिकेतील अश्विनी महिला आणि गृहिणींसाठी प्रेरणा आहे. अश्विनीची भूमिका अभिनेत्री दीपा चौधरी हिने साकारली आहे. दरम्यान तू चाल पुढं मालिकेला १५ ऑगस्ट रोजी १ वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्यानिमित्ताने दीपाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

दीपा चौधरी हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन त्याचप्रमाणे आज झी मराठीचा वर्धापन दिन देखील आहे. माझ्यासाठी हा दिवस आणखी एका गोष्टीसाठी खूप खास आहे कारण आज पासून एक वर्षापूर्वी १५ ऑगस्टलाच ‘तू चाल पुढं’ या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता दीपा, अश्विनी बनून एका नवीन रूपात तुम्हा सर्वांच्या भेटीस आली होती. खूप कमी वेळात तुम्ही सर्वांनी तिला ‘तू चाल पुढं’ म्हणत आपलंसं करून घेतलं. आणि खऱ्या अर्थाने तिला दाही दिशांनी सुखाने साद घातली गेली. झी मराठीचा विश्वास, झी स्टुडिओचा पाठिंबा आणि तुम्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भरभरून प्रेम आणि उदंड प्रतिसादामुळे अश्विनीचा स्वतंत्र होत स्वप्नांच्या दिशेने भरारी घेण्याचा प्रवास निर्विघ्नरित्या सुरू आहे.

ती पुढे म्हणाली की, माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून ‘अश्विनी’ सारख्या एका खंबीर गृहिणीचे नेतृत्व छोट्या पडद्यावर साकारण्याची संधी मला दिली याबद्दल झी मराठी आणि झी स्टुडिओजचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे हे प्रेम सदैव असेच पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Web Title: Within a short time, Ashwini was loved by everyone by saying 'Tu chaal Pudha', Ashwini fame Deepa Chaudhary's special post