'ठरलं तर मग' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? जुई गडकरी म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:08 IST2025-05-06T12:07:39+5:302025-05-06T12:08:56+5:30

Tharala Tar Mag Serial : सध्या 'ठरलं तर मग' मालिका रंजक वळणावर आली. विलास मर्डर प्रकरणी अर्जुनला एक महत्त्वाचा पुरावा सापडला आहे.

Will the series 'Tharla Tar Mag' bid farewell to the audience? Jui Gadkari said... | 'ठरलं तर मग' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? जुई गडकरी म्हणाली...

'ठरलं तर मग' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? जुई गडकरी म्हणाली...

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag Serial). या मालिकेला सुरूवातीपासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील सायली आणि अर्जुन या जोडीने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. सध्या ही मालिका रंजक वळणावर आली. विलास मर्डर प्रकरणावर सध्या सुनावणी सुरू आहे आणि अर्जुनला एक महत्त्वाचा धागा हाती लागतो. त्यात आता तो प्रियाची चौकशी करणार आहे. या चौकशीदरम्यान त्याच्या हाती मोठा पुरावा सापडणार आहे. त्यामुळे आता ही मालिका संपणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. दरम्यान या मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी' सेशनदरम्यान मालिका संपणार का, या चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

जुई गडकरी सोशल मीडियावर सक्रीय असून ती अनेकदा चाहत्यांसोबत संवाद साधत असते. अलिकडेच जुईने इंस्टाग्रामवर  'आस्क मी' सेशन केलं. या सेशनदरम्यान तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तिला एका युजरने विचारले की 'आता सत्य समोर येत आहे, तर मालिका संपणार नाही ना? आम्हाला ही मालिका खूप आवडते…' त्यावर जुई म्हणाली की, 'आभारी आहे! नाही. एवढ्यात ही मालिका नक्कीच नाही संपणार. अजून खूप गोष्टी बाकी आहेत. 

''गुन्हा मोठा तेवढीच शिक्षा मोठी!''

ती पुढे म्हणाली की,  सध्या मालिका पाहून काही लोक म्हणतात, ''काय चाललंय'' तर, काही लोक बोलतात,  ''असंच चालू राहू द्या, आम्हाला ठरलं तर मग मालिका पाहून छान वाटतं.'' मी सगळ्यांना एवढंच सांगेन की, ''गुन्हा मोठा तेवढीच शिक्षा मोठी! लवकरच तुमच्या मनासारखं पाहायला मिळणार आहे. त्याची सुरुवात आता झालीय…त्यामुळे ठरलं तर मग मालिका असेच पाहत राहा.''

 

Web Title: Will the series 'Tharla Tar Mag' bid farewell to the audience? Jui Gadkari said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.