Agga Bai Sasubai Serial : आसावरीला अभिजीतपासून वेगळं करणार सोहम?, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 07:15 AM2020-01-31T07:15:00+5:302020-01-31T07:15:00+5:30

आसावरीसाठी स्पेशल डिनर डेट प्लान करतात आणि हा प्लान आसावरीलाही आवडतो.

Will soham break asavari and abhijeet reletion in Agga Bai Sasubai Serial? | Agga Bai Sasubai Serial : आसावरीला अभिजीतपासून वेगळं करणार सोहम?, वाचा सविस्तर

Agga Bai Sasubai Serial : आसावरीला अभिजीतपासून वेगळं करणार सोहम?, वाचा सविस्तर

googlenewsNext

अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे ही मालिका अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. 

अभिजित आसावरीच्या दिमाखदार लग्न सोहळ्यानंतर आता ते दोघे राजस्थान-उदयपूरला फिरायला गेले आहेत. आसावरीच जरी अभिजीतसोबत लग्न झालं असलं तरी तिचं सर्व लक्ष आजोबा, सोहम आणि शुभ्राकडे लागून राहिलेलं आहे. अभिजीत आणि आसावरीच लग्न सोहमला मात्र पटलेलं नाही आहे आणि तो त्यांना कसं वेगळं करता येईल याच्या योजना आखतोय. त्या दिशेने सोहमने पहिलं पाऊल देखील उचललं आहे. अभिजीत आणि आसावरी या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी सोहम शुभ्राला घेऊन राजस्थान-उदयपूरला गेला आहे. एकीकडे अभिजीत राजे आसावरीसोबत राजस्थानची ट्रिप अविस्मरणीय बनवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत ते आसावरीसाठी स्पेशल डिनर डेट प्लान करतात आणि हा प्लान आसावरीलाही आवडतो.  तर दुसरीकडे सोहम त्या दोघांना एकत्र वेळ व्यतीत करायला मिळू नये म्हणून धडपड करतोय. सोहम राजस्थानला पोहोचला तर आहे आता तो या दोघांना वेगळं करण्यासाठी काय करेल? आणि त्यात तो यशस्वी ठरेल का?  हे पाहणं कमालीचं ठरणार आहे.

Web Title: Will soham break asavari and abhijeet reletion in Agga Bai Sasubai Serial?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.