राणादा जाणार बिग बॉसच्या घरात?, अभिनेता हार्दिक जोशीनं दिली ही हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 18:30 IST2022-09-09T18:29:54+5:302022-09-09T18:30:23+5:30

Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची सध्या सर्वत्र खूप चर्चा होताना दिसत आहे.

Will Ranada go to Bigg Boss house?, actor Hardik Joshi gave this hint | राणादा जाणार बिग बॉसच्या घरात?, अभिनेता हार्दिक जोशीनं दिली ही हिंट

राणादा जाणार बिग बॉसच्या घरात?, अभिनेता हार्दिक जोशीनं दिली ही हिंट

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची सध्या सर्वत्र खूप चर्चा होताना दिसत आहे. नुकतेच कलर्स मराठीनं चौथ्या पर्वाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर या शोमध्ये कोण-कोण स्पर्धक पाहायला मिळणार, याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. या चौथ्या पर्वात कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

बिग बॉस मराठी ४च्या संभाव्य स्पर्धकांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांची नावे घेतली जात आहेत. यात प्राजक्ता गायकवाड, तेजश्री जाधव, शर्वरी लोहकरे यांच्या नावांची चर्चा होताना दिसते आहे. पण सर्वात जास्त उत्सुकता आहे एका नावाची, ते नाव म्हणजे हार्दिक जोशीचं. तो बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. काही महिन्यांपूर्वीच त्याचा अभिनेत्री अक्षया देवधरसोबत साखरपुडा झाला. त्यामुळे आता तो बिग बॉसच्या घरात दिसू शकतो, असा अंदाज लोकांनी लावला होता. पण आता चर्चेवर पहिल्यांदाच हार्दिक जोशी (Hardik Joshi)ने मौन सोडले आहे. 


हार्दिक जोशी म्हणाला की, मी बिग बॉस मराठी ४ मध्ये जाणार की नाही? याचा प्रेक्षकांनी अंदाज लावावा. शेवटपर्यंत त्याची उत्सुकता राहिली पाहिजे. याबद्दल मी आत्ताच काही सांगणार नाही, माझे नाव सतत चर्चेत असले तरी सध्या तरी मला याबद्दल काहीच सांगायचे नाही. दरम्यान हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे हार्दिक जोशी बिग बॉसच्या घरात जाणार की नाही, हे लवकरच समजेल.

Web Title: Will Ranada go to Bigg Boss house?, actor Hardik Joshi gave this hint