Bigg Boss Marathi 5 : १०० नाही ७० दिवसातच बिग बॉस मराठी ५ गुंडाळणार गाशा?, सोशल मीडियावर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 11:42 IST2024-09-21T11:34:36+5:302024-09-21T11:42:35+5:30

Bigg Boss Marathi Season 5: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे. १०० दिवस चालणारा हा शो आता ७० दिवसातच गाशा गुंडाळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

Will Bigg Boss Marathi 5 wrap up in 100 not 70 days? Gasha, excitement on social media | Bigg Boss Marathi 5 : १०० नाही ७० दिवसातच बिग बॉस मराठी ५ गुंडाळणार गाशा?, सोशल मीडियावर खळबळ

Bigg Boss Marathi 5 : १०० नाही ७० दिवसातच बिग बॉस मराठी ५ गुंडाळणार गाशा?, सोशल मीडियावर खळबळ

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे. यंदा या शोचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांच्याऐवजी सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh) करत आहे. त्याच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान १०० दिवस चालणारा हा शो आता ७० दिवसातच गाशा गुंडाळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये यंदा मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसोबतच इंडियन आयडॉलचा विजेता अभिजीत सावंत, हिंदी बिग बॉसमधून आलेली निक्की तांबोळी, स्प्लिट्सव्हिलामधून आलेला अरबाज पटेल आणि सोशल मीडियावरील इन्फ्ल्युन्सर पाहायला मिळाले. यंदाच्या शोने पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. घरात भांडण तंटे, फ्रेंडशीप, अफेयर आणि दोन गट पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरातून आर्या जाधव, पुरूषोत्तम पाटील, योगिता चव्हाण, वैभव चव्हाण, निखिल दामले आणि इरिना रुडाकोवा बाहेर पडले. आता शो हळूहळू मनोरंजक होत असताना १०० दिवसांऐवजी ७० दिवसातच हा शो बंद होणार असल्याचे सांगितले जाते.

या दिवशी पार पडणार ग्रॅण्ड फिनाले

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. नेहमी बिग बॉस मराठीचा शो १०० दिवस चालतो. पण आता शो ७० दिवसात बंद होणार असल्याचे सांगितले जातंय.  म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रॅण्ड फिनाले पार पडणार आहे, अशी चर्चा रंगलीय. मात्र याबद्दल अद्याप वाहिनीकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 

हे आहेत घरात स्पर्धक
सध्या बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, संग्राम चौगुले आणि धनंजय पोवार हे स्पर्धक आहेत. यापैकी कोण यंदाची ट्रॉफी जिंकणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Will Bigg Boss Marathi 5 wrap up in 100 not 70 days? Gasha, excitement on social media