What! जूनमध्ये 'द कपिल शर्मा शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप, समोर आले या मागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 18:01 IST2023-04-15T17:57:06+5:302023-04-15T18:01:15+5:30

कपिल शर्मा शोच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, 'द कपिल शर्मा शो' बंद होणार आहे.

why the kapil sharma show off go air last episode telecast in june | What! जूनमध्ये 'द कपिल शर्मा शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप, समोर आले या मागचं कारण

What! जूनमध्ये 'द कपिल शर्मा शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप, समोर आले या मागचं कारण

'द कपिल शर्मा शो' हा टीव्ही शो खूप लोकप्रिय आहे. कपिल शर्मासोबत बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतचे बडे स्टार्स प्रत्येक एपिसोडमध्ये सहभागी असतात. पण कपिल शर्मा शोच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, 'द कपिल शर्मा शो' बंद होणार आहे. या सीझनचा शेवटचा एपिसोड जूनमध्ये शूट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर कपिल शर्मा ब्रेक घेईल आणि काही वेळाने 'कपिल शर्मा शो' पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येईल. 


गेल्या अनेक वर्षांपासून 'द कपिल शो' चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक वेळी कॉमेडियन कपिल शर्मा हा शो होस्ट करतो आणि त्याच्या टीमसोबत हा कार्यक्रम नवीन थीमवर प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मधल्या काळात तो  ब्रेकही घेतो. आता पुन्हा एकदा टीम सुट्टीवर जाणार आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'च्या रिपोर्टनुसार, कपिल शर्माला आता विश्रांती घ्यायची आहे. त्यामुळेच हा शो तात्पुरता बंद करण्याचा विचार सुरू आहे.  या सीझनचा शेवटचा एपिसोड कधी येईल? यावर प्रतिक्रिया देताना शोशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, 'अशी कोणतीही तारीख अद्याप निश्चित झालेली नाही'. मे महिन्याच्या अखेरीस तो शूट पूर्ण करेल. त्यानंतर जूनपर्यंत सीझन संपेल, अशी अपेक्षा आहे.

'द कपिल शर्मा शो' बंद होण्याचे एक कारण म्हणजे कपिल शर्माकडे अनेक इंटरनॅशनल टूर लाइन-अप आहेत. त्याचे शेड्युल खूप टाइट आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे 'द कपिल शर्मा शो'चा नवा सीझन कधी येईल हे सध्या तरी माहिती नाही.

Web Title: why the kapil sharma show off go air last episode telecast in june