‘निक्की तंबोली औकात में रहे...’!  ट्विटरवर का ट्रोल होतेय ‘बिग बॉस 14’ची बाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 16:04 IST2021-03-18T16:03:37+5:302021-03-18T16:04:35+5:30

गुरुवारी दुपारी अचानक ट्विटरवर दोन ट्रेंड्स चर्चेत आले आणि या ट्रेंड्सनी ट्विटरवर ‘बिग बॉस 14’ची जबरदस्त हवा केली. ‘

why nikki tamboli aukat me reh is trending on twitter along with aly sirf jasmin ka hai | ‘निक्की तंबोली औकात में रहे...’!  ट्विटरवर का ट्रोल होतेय ‘बिग बॉस 14’ची बाला?

‘निक्की तंबोली औकात में रहे...’!  ट्विटरवर का ट्रोल होतेय ‘बिग बॉस 14’ची बाला?

ठळक मुद्देसोशल मीडियावर वाईट पद्धतीने ट्रोल होताना बघून निक्कीला राहावले नाही. अखेर तिने जास्मीन व अली गोनीच्या चाहत्यांना जशास तसे उत्तर दिले.

‘बिग बॉस 14’ हा शो कधीच संपला. पण या शोमध्ये सहभागी स्पर्धकांची चर्चा आत्ताही सुरु आहे. गुरुवारी दुपारी अचानक ट्विटरवर दोन ट्रेंड्स चर्चेत आले आणि या ट्रेंड्सनी ट्विटरवर ‘बिग बॉस 14’ची जबरदस्त हवा केली. ‘निक्की तंबोली औकात में रहे’ आणि ‘अली सिर्फ जास्मीन का है,’ हेच ते दोन ट्रेंड्स. जास्मीन भसीन व अली गोनीचे चाहते गुरूवारी अचानक आक्रमक झालेत. त्यांनी निक्की तंबोलीविरोधात ट्विट करण्याचा धडाका लावला. इतका की, अखेर निक्कीला यावर रिअ‍ॅक्ट करावे लागले. पण असे काय झालेत की,अली व जास्मीनचे चाहते भडकले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याला कारण ठरली, निक्कीची ताजी मुलाखत.

 तर व्हीजे एंडी कुमारने निक्कीची मुलाखत घेतली आणि इथून हा सगळा सिलसिला सुरु झाला. आता निक्की या मुलाखतीत अशी काय बोलली तर अली गोनीबद्दलच्या भावना. अली गोनीसोबत डेटवर जायला तुला आवडेल का? असा प्रश्न एंडी कुमारने मुलाखतीदरम्यान केला. यावर ‘हो’ असे उत्तर लाजत लाजत निक्कीने दिले. अली गोनीबद्दल माझ्या मनात अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे, असेही निक्की म्हणाली. ती इथेच थांबली नाही तर जास्मीनचा कोणताही फॅन बेस नाही, असेही ती म्हणाली. नेमक्या याच कारणाने अली व जास्मिनचे फॅन्स भडकले आणि त्यांनी निक्कीला फैलावर घेतले.

याचे पण पैसे दिलेत का?


सोशल मीडियावर वाईट पद्धतीने ट्रोल होताना बघून निक्कीला राहावले नाही. अखेर तिने जास्मीन व अली गोनीच्या चाहत्यांना जशास तसे उत्तर दिले. ‘अरे वा, असे नाही तर तसे. प्रेम किंवा द्वेष. माझ्याबद्दल बोलायला तुमच्याजवळ इतका वेळ आहे, हे बघून आनंद झाला. यासाठीही पैसे दिलेत का?’, असे ट्विट तिने केले.

Web Title: why nikki tamboli aukat me reh is trending on twitter along with aly sirf jasmin ka hai