कोण असतील या 'Mrs. मुख्यमंत्री'?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 13:19 IST2019-06-14T13:18:26+5:302019-06-14T13:19:00+5:30

सोशल मीडियावर सध्या Mrs. मुख्यमंत्री यांची चर्चा रंगली आहे.

Who would be the 'Mrs. Chief Minister ?, know about it | कोण असतील या 'Mrs. मुख्यमंत्री'?, जाणून घ्या याबद्दल

कोण असतील या 'Mrs. मुख्यमंत्री'?, जाणून घ्या याबद्दल

सध्या सोशल मीडियावर सध्या Mrs. मुख्यमंत्री यांची चर्चा रंगली आहे. कोण आहेत या  Mrs. मुख्यमंत्री हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.  Mrs. मुख्यमंत्री ही नवीन मालिका असून ती लवकरच झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

मालिकेचं नाव Mrs.मुख्यमंत्री असलं तरी ही मालिका कोणत्याही राजकीय व्यक्तीशी किंवा राजकीय घटनेशी संबंधित नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही मालिका २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत पाठमोरे दोन जण पहायला मिळत आहेत. ते दोघे कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकराजा उत्सुक होता. या मालिकेतील  Mrs. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत मिथुन चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री अमृता धोंगडे दिसणारेय. ती या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री करतेय. नुकताच या मालिकेचा एक टीझर रिलीज झाला त्यातून अमृताचा हटके अंदाज प्रेक्षकांच्या समोर आलाय.


प्राईम टाईम मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या झी मराठी वाहिनीने आता आणखी एक खास मालिका आणली आहे.

हक्काचं मनोरंजनाचं व्यासपीठ असलेल्या झी मराठीवर आतापर्यंत प्रेक्षकांनी नेहमीच भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे Mrs.मुख्यमंत्री या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा वाहिनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याचाच अर्थ लागिरं झालं जी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणारेय. 

 

Web Title: Who would be the 'Mrs. Chief Minister ?, know about it