मुग्धा की प्रथमेश कोणी केलं पहिलं प्रपोझ?, अन् मग अशी सुरु झाली ही सुरेल लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:16 IST2023-07-05T15:16:31+5:302023-07-05T15:16:53+5:30

Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate : लोकमत फिल्मीमध्ये नुकतेच मुग्धा आणि प्रथमेश यांचं केळवण पार पडले. यावेळी त्या दोघांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.

Who made the first proposal of Mugdha or Prathamesh?, and then this beautiful love story began | मुग्धा की प्रथमेश कोणी केलं पहिलं प्रपोझ?, अन् मग अशी सुरु झाली ही सुरेल लव्हस्टोरी

मुग्धा की प्रथमेश कोणी केलं पहिलं प्रपोझ?, अन् मग अशी सुरु झाली ही सुरेल लव्हस्टोरी

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील लाडके मोदक आणि मॉनिटरने आपल्या प्रेमाची कबुली देत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. मुग्धा (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश (Prathamesh Laghate) दोघेही अप्रतिम गायक आहेत पण त्यांची केमिस्ट्रीही छान आहे. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. नुकतेच लोकमत फिल्मीमध्ये मुग्धा आणि प्रथमेश यांचं केळवण पार पडले. यावेळी त्या दोघांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.

मुग्धा आणि प्रथमेश यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली. ते म्हणाले की, आमचं म्युझिकल ट्युनिंग जमले. आमच्या दोघांचा सूर गवसला. एका पॉइंटला असं झालं की कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या भेटी खूप होत होत्या. मात्र जर कारणाने आमची भेट नाही झाली. तर आम्हाला कसे तरी वाटायचे आणि आम्ही सहज भेटायचा प्लान करायचो. अशा भेटी वाढायला लागल्या. एक मित्र म्हणून किंवा छान ट्युनिंग जमले म्हणून भेटलो नाही तर आम्ही मिस करतो आहे, याची जाणीव व्हायला लागली. 

पुढे प्रथमेश म्हणाला की,  कार्यक्रमा व्यतिरिक्त भेटी वाढल्या. मग हळूहळू असं दोघांच्या मनात आले की आम्ही दोघे छान समजून घेतो आहे. आधी फ्रेंड्स आहोत आपल्यातली मैत्री चांगली आहे. मग आपलं जुळू शकतं हे आम्हाला जाणवलं. पण कुणी व्यक्त केलं नाही. एका पॉइंटला एवढं वाटायला लागलं की मी साडेतीन चार वर्षांपूर्वी पुढाकार घेतला. आम्हाला दोघांना एकमेकांबद्दल काय वाटते आहे आणि उत्तर काय असणार आहे, हे देखील माहित होते. कार्यक्रमाच्या रिहर्सलसाठी आम्ही भेटलो होतो. रिहर्सल संपल्यानंतर आपल्याला काय काय करायचं याबद्दल चर्चा सुरू असताना मी मुग्धाला प्रपोझ केला. मला हेदेखील माहित होते की, हो म्हणेल पण ही लगेच होकार कळवणार नाही. २-३ एप्रिलला प्रपोझ केलं आणि ५ एप्रिलला मुग्धाचा वाढदिवस असतो. त्यादिवशी आम्ही भेटलो. वाढदिवस साजरा केला आणि अखेर मुग्धाने होकार दिला. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Who made the first proposal of Mugdha or Prathamesh?, and then this beautiful love story began