जेव्हा रिध्दीमाला भेटला जबरा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 17:23 IST2017-01-10T17:06:55+5:302017-01-10T17:23:24+5:30

‘बहू हमारी रजनी-कान्त’ या लोकप्रिय मालिकेतील मानवरूपातील यंत्रमानव सून रजनीची भूमिकासाकारल्याबद्दल रिध्दिमा पंडितचे खूप कौतुक होत आहे. पण आपल्या ...

When Ridhimi met the fan | जेव्हा रिध्दीमाला भेटला जबरा फॅन

जेव्हा रिध्दीमाला भेटला जबरा फॅन

हू हमारी रजनी-कान्त’ या लोकप्रिय मालिकेतील मानवरूपातील यंत्रमानव सून रजनीची भूमिकासाकारल्याबद्दल रिध्दिमा पंडितचे खूप कौतुक होत आहे. पण आपल्या स्वत:चेही इतके कट्टर चाहते असू शकतील, याची कल्पना मात्र रिध्दिमाला कधीच नव्हती. अलीकडेच एका मीटिंगसाठी जात असताना तिची कार रस्त्यात बिघडली. तेव्हा त्याठिकाणहून तिने एक रिक्षा केली. रिक्षात बसल्यानंतर थोडा वेळाने तिच्या लक्षात आले की रिक्षा भलत्याच दिशेला जातेय. तिने रिक्षाचालकाला त्याबद्दल हटकले असता, चालकाने तिला सांगितले की त्याचे सारे कुटुंबीय रजनीचे कट्टर चाहते आहेत. तिला जेथे जायचे आहे, तेथून आपले घर जवळच असल्याने तिने आपल्या कुटुंबियांना भेटावे, अशी त्याने इच्छा व्यक्त केली. रिध्दिमा सुरुवातीला थोडी धास्तावली,परंतु त्याच्या घरी जाताच त्याचे कुटुंबीने आणि मुलांनी तिचे जसे प्रेमाने स्वागत केले, त्यामुळे तिची भीती क्षणात गायब झाली. या कुटुंबाशी भेटून तिने खूप मनमोकळ्या गप्पाही मारल्या. 

या घटनेबद्दल रिध्दिमा म्हणाली, “मला रिक्षावाल्याने दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केल्यावर सुरुवातीला मी थोडीशी घाबरले होते. सुदैवाने मला तो परिसर ठाऊक होता आणि मी रिक्षाचा क्रमांकही लक्षात ठेवला होता. पण त्याने सांगितलं की त्याचे कुटुंबीय आणि मुलं माझी फारच कट्टर चाहती आहेत. प्रारंभी मला खात्री वाटत नव्हती; पण मी त्याच्या मुलांना दुरूनच हात हलविताना पाहिल्यावर मी थोडी निश्चित झाले. मी त्यांना भेटले आणि त्यांच्याशी काही काळ गप्पा मारल्या. त्यानंतर त्याने मला माझ्या मीटिंगच्या ठिकाणी नेऊन सोडलं. मी सुरुवातीला थोडी धास्तावले होते, हे खरं,पण नंतर मला जे प्रेम मिळालं, त्याने मी फार भारावून गेले.”

Web Title: When Ridhimi met the fan