Shefali Jariwala : ...अन् नकळतपणे शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा पूर्ण झाली, मृत्यूनंतर असं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 10:22 IST2025-06-28T10:20:06+5:302025-06-28T10:22:41+5:30

Shefali Jariwala : शेफाली जरीवालाने एका मुलाखतीत तिची शेवटची इच्छा सांगितली होती. अभिनेत्रीच्या निधनानंतर नकळत तिची ही इच्छा पूर्ण झाल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे

What was Shefali Jariwala last wish before death kaanta girl big revealation | Shefali Jariwala : ...अन् नकळतपणे शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा पूर्ण झाली, मृत्यूनंतर असं काय घडलं?

Shefali Jariwala : ...अन् नकळतपणे शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा पूर्ण झाली, मृत्यूनंतर असं काय घडलं?

शेफाली जरीवालाचं वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शेफालीच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला. शेफाली सोशल मीडियावर सक्रीय होती. त्यामुळे चाहते तिच्या संपर्कात असायचे. शेफालीच्या निधनानंतर तिची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत शेफालीने तिची शेवटची इच्छा काय होती, हे सांगितलं होतं. शेफालीच्या निधनानंतर नकळतपणे तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. काय म्हणाली होती शेफाली? जाणून घ्या.

शेफालीची शेवटची इच्छा काय होती?

बिग बॉस १३ चा स्पर्धक पारस छाब्रासोबत शेफालीने मुलाखत केली होती. या मुलाखतीची एक जुनी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत शेफालीने तिच्या शेवटच्या इच्छेबद्दल खुलासा केला होता. तुला वारंवार 'काँटा लगा गर्ल' बोलल्याने कंटाळा येत नाही का? त्यावर शेफालीने हसत हसत सांगितलं की, "कधीच कंटाळा येत नाही. या जगात केवळ एक काँटा गर्ल आहे आणि ती फक्त मी आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत काँटा गर्ल म्हणूनच ओळखली जावी, ही माझी इच्छा आहे." अशा खुलासा शेफालीने केला होता. 

अन् नकळतपणे शेफालीची शेवटची इच्छा पूर्ण झाली

शेफालीच्या निधनानंतर अनेकांनी तिला काँटा गर्ल म्हणूनच संबोधित केलं. त्यामुळे नकळतपणे शेफालीची ही इच्छा पूर्ण झालेली दिसली. याशिवाय तिचं आयकॉनिक गाणं काँटा लगाची आठवण तिचे चाहते काढत आहेत. शेफाली जरीवालाचं वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शेफालीच्या अकस्मात निधनामुळे तिच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. शेफाली ही खूप चांगली व्यक्ती होती, तिचा स्वभाव खूप चांगला होता. ती कोणाला कधी उलटून बोलायची नाही. नम्र स्वभाव आणि मनमोकळं व्यक्तिमत्व, अशा शब्दांमध्ये शेफालीच्या चाहत्यांनी तिची आठवण जागवली आहे.

 

Web Title: What was Shefali Jariwala last wish before death kaanta girl big revealation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.