"तिची नस चालू होती, पण..."; मृत्यूच्या काही क्षणांआधी शेफालीसोबत काय घडलं? मैत्रिणीने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:54 IST2025-07-01T09:54:17+5:302025-07-01T09:54:35+5:30
Shefali Jariwala Last Moments: शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीने मोठा खुलासा केला. मृत्यूच्या काही क्षणांआधी शेफालीसोबत काय घडलं? याचा भावुक खुलासा तिने केला

"तिची नस चालू होती, पण..."; मृत्यूच्या काही क्षणांआधी शेफालीसोबत काय घडलं? मैत्रिणीने केला मोठा खुलासा
Shefali Jariwala Last Moments: 'काँटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाच्या अकस्मात निधनामुळे सर्वांना धक्का बसला. वयाच्या ४२ व्या वर्षी शेफालीने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटका आल्याने शेफालीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु तिथेच उपचाराआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफालीचं निधन होण्यापूर्वी काय घडलं? तिची अवस्था कशी होती? याविषयी शेफालीची जवळची मैत्रीण पूजाने खुलासा केला. शेवटच्या क्षणांत शेफालीसोबत काय घडलं, याविषयी पूजा काय म्हणाली? जाणून घ्या.
त्या रात्री शेफालीसोबत काय घडलं?
शेफालीची जवळची मैत्रीण पूजाने भावुक खुलासा केला. २७ जूनच्या रात्रीचा उल्लेख करत पूजा म्हणाली, "शेफालीच्या कुटुंबाला आणि मला समजलं की, घरात सत्यनारायणाची पूजेची तयारी सुरु होती. शेफालीचे अंतिमसंस्कार जेव्हा होते, तेव्हा आम्हाला तिच्या घरात प्रवेश मिळाला. पूजेसाठी संपूर्ण घर सजवण्यात आलं होतं. त्या रात्री शेफालीने नेहमीप्रमाणे जेवण केलं. शेफालीचा पती पराग सिम्बाला फिरवायला खाली गेला होता."
"पराग जसा खाली गेला त्यानंतर लगेचच शेफालीने त्याला हेल्परकडे निरोप देऊन पुन्हा घरी यायला सांगितलं. दीदीची तब्येत ठीक नाही, असं हेल्पर म्हणाली. तेव्हा परागने हेल्परला खाली बोलावून कुत्र्याला फिरवायला सांगितलं आणि तो वर गेला. त्यानंतर जे काही झालं त्यामुळे आम्ही सर्व हैराण झालो. पराग लिफ्ट खाली यायची वाट बघत होता. हेल्पर खाली आल्यावर परागने तिच्याकडे कुत्र्याला देऊन तो लगोलग वर गेला."
"परागने बघितलं तर शेफालीची नस चालू होती. परंतु तिने डोळे उघडले नव्हते आणि तिचं शरीर थंड पडलं होतं. त्यामुळेच काहीतरी गडबड आहे याची जाणीव होऊन परागने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु त्याआधीच तिचं निधन झालं होतं." असा खुलासा पूजाने केला.