असं काय घडलं की अभिज्ञा भावेनं नवऱ्याला केली दमदाटी, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 11:43 IST2022-07-19T11:42:39+5:302022-07-19T11:43:07+5:30

Abhidnya Bhave: अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या झी मराठीवरील तू तेव्हा तशी मालिकेत काम करताना दिसते आहे.

What happened that Abhidnya Bhave forced her husband, the video came out | असं काय घडलं की अभिज्ञा भावेनं नवऱ्याला केली दमदाटी, व्हिडीओ आला समोर

असं काय घडलं की अभिज्ञा भावेनं नवऱ्याला केली दमदाटी, व्हिडीओ आला समोर

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) सध्या झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने पुष्पवल्लीची निगेटिव्ह भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. अभिज्ञा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिला मालिकेत जितकी पसंती मिळते तितकेच तिचे रील्स आणि व्हिडिओस सुद्धा चाहत्यांना आवडतात. तिच्या नव्या रिलने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत ती नवऱ्याला दमदाटी करताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

अभिज्ञा भावे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिज्ञा सांगते की, आनंदी आणि सुखी वैवाहिक आयुष्याची ही काही रहस्य आहेत. तुमच्या नवऱ्याचं म्हणणं ऐका, त्याला आदराने वागवा. एवढं म्हणून तिचा नवरा मेहुल काहीतरी बोलायला जातो आणि अभिज्ञा त्याच्यावर वैतागते आणि त्याला दमदाटी करते. ती बिचाऱ्याची बोलती बंद करते. आणि त्याला सुद्धा बोलायची संधी द्या असे विरोधाभास असलेलं वाक्य पूर्ण करते. एकाच व्हिडिओमध्ये असलेला हा विरोधाभास बघून चाहत्यांना हसू आवरणे कठीण झाले आहे.

स्वतः अभिज्ञाचा नवरा मेहुलने सुद्धा कमेंट करून #reality असे लिहिले आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. 
 

Web Title: What happened that Abhidnya Bhave forced her husband, the video came out