भारती सिंगने काय ठेवलं आपल्या लेकाचं नाव?, जन्मानंंतर २ महिन्यांनी झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 17:42 IST2022-06-11T17:38:10+5:302022-06-11T17:42:09+5:30

Bharti Singh Baby Name: लाफ्टर क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा दोन महिन्यांचा झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीने आता तिच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे.

What did Bharti Singh name his son? It was revealed 2 months after his birth | भारती सिंगने काय ठेवलं आपल्या लेकाचं नाव?, जन्मानंंतर २ महिन्यांनी झाला खुलासा

भारती सिंगने काय ठेवलं आपल्या लेकाचं नाव?, जन्मानंंतर २ महिन्यांनी झाला खुलासा

लाफ्टर क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा दोन महिन्यांचा झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीने आता तिच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. बऱ्याच दिवसांपासून भारतीने मुलाच्या नावाचा सस्पेंस ठेवला होता. भारती तिच्या मुलाला गोला असे प्रेमाने संबोधते. परंतु आता या कॉमेडियनच्या मुलाचे खरे नाव देखील समोर आले आहे.

सुरुवातीला भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी सांगितले होते की ते त्यांच्या मुलाला प्रेमाने गोला म्हणतात, परंतु लवकरच ते त्यांच्या मुलाचे नाव उघड करतील. आता या कॉमेडियनच्या मुलाचे नाव समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या बाळाचे नाव लक्ष्य ठेवले आहे. तसेच टेली मसालाने शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, तो दोन महिन्यांचा झाला आहे. तसेच या व्हिडीओत लक्ष्य नावाचा केक देखील पाहायला मिळतो आहे. लवकरच भारती आणि हर्ष त्यांच्या बाळाचे नाव जाहीर करतील.

भारतीने अद्याप आपल्या मुलाचा चेहराही दाखवलेला नाही. भारती आणि हर्ष शेवटचे 'हुनरबाज' आणि 'द खतरा शो'मध्ये दिसले होते. मुलाला जन्म दिल्यानंतर ११ दिवसांत भारती पुन्हा कामाला लागली. तिच्या या निर्णयाबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केले, तर काहींनी तिच्यावर मुलासाठी वेळ न दिल्याबद्दल आणि 'पैशाच्या मागे धावत' असल्याची टीका केली होती.

Web Title: What did Bharti Singh name his son? It was revealed 2 months after his birth