मिसेस मुख्यमंत्री मालिकेत रंगाणार लग्न सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 07:15 IST2019-09-22T07:15:00+5:302019-09-22T07:15:00+5:30

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली.

Wedding seesion happen in mrs. mukhyamantri serial | मिसेस मुख्यमंत्री मालिकेत रंगाणार लग्न सोहळा

मिसेस मुख्यमंत्री मालिकेत रंगाणार लग्न सोहळा

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली. मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या मालिकेत सध्या लगीनघाई सुरु आहे. समर आणि सुमीचं लग्न लवकरच पार पडणार आहे.

आपण नेहमी चित्रपटात पाहतो कि नवरदेवाची वरात जेव्हा येते नवरा घोडीवर बसून येतो. त्यातील राजेशाही थाट काही वेगळाच असतो. मालिकेतील ताई मॅडमच्या एकुलत्या एक मुलाचा लग्नसोहळा देखील तितकाच दिमाखदार असणार आहे. सुमीचा पायलट म्हणजेच समर देखील लग्न मंडपात घोडी वरूनच येणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यातील समरचा खास क्षणचित्र प्रेक्षक-चाहत्यांसाठी. सुमीच्या लग्नासाठी सगळं गाव उत्सुक आहे. तिच्या इच्छेप्रमाणे मेहंदी आणि संगीत कार्यक्रम देखील होणार आहे. रविवार २२ सप्टेंबर संध्याकाळी ७ वाजता समर-सुमीच्या लग्नाचा मुहूर्त असून सर्व प्रेक्षक झी मराठी वाहिनीवर त्यांचा लग्नसोहळा अनुभवू शकतात.
 

Web Title: Wedding seesion happen in mrs. mukhyamantri serial