मकर संक्रातीच्या निमित्ताने रिश्ता लिखेंगे हम नया फेम तेजस्वी प्रकाश वायंगणकरने शेअर केले तिचे सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 08:46 AM2018-01-13T08:46:54+5:302018-01-13T14:16:54+5:30

मकर संक्राती जवळ आली असल्याने सगळेच हा सण साजरा कऱण्याची जय्यत तयारी करत आहे. रिश्ता लिखेंगे हम नया या ...

We will share the relationship on the occasion of Makar Sankranta, we shared a new fame with the bright light Waingankar's Secret | मकर संक्रातीच्या निमित्ताने रिश्ता लिखेंगे हम नया फेम तेजस्वी प्रकाश वायंगणकरने शेअर केले तिचे सिक्रेट

मकर संक्रातीच्या निमित्ताने रिश्ता लिखेंगे हम नया फेम तेजस्वी प्रकाश वायंगणकरने शेअर केले तिचे सिक्रेट

googlenewsNext
र संक्राती जवळ आली असल्याने सगळेच हा सण साजरा कऱण्याची जय्यत तयारी करत आहे. रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेत दियाची भूमिका साकारणाऱ्या तेजस्वी प्रकाश वायंगणकरसाठी हा सण खूप खास आहे. या सणाच्या निमित्ताने तिचे एक सिक्रेट तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. पतंग उडवण्याची हौस ही केवळ मुलांना असते असे म्हटले जाते. पण तेजस्वी यासाठी अपवाद ठरली आहे. तिला लहानपणापासूनच पतंग उडवायला खूप आवडतो. ती आजही मालिकांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असली तरी पतंग उडवण्यासाठी वेळ काढते. मकर संक्राती या सणाला पतंग उडवायला मिळत असल्याने या सणाची ती वर्षभर वाट पाहात असते. याविषयी ती सांगते, “माझ्यासाठी मकर संक्रांतीचे महत्त्व खूप आहे. सध्या मी रिश्ता लिखेंगे हम नया या माझ्या मालिकेच्या चित्रीकरणासाठी राजस्थानमध्ये आहे. राजस्थानसोबत माझे एक खास नाते आहे. पहरेदार पिया की या माझ्या मालिकेचे देखील राजस्थानमध्येच चित्रीकरण झाले होते. या मकर संक्रातीला मी माझ्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने मला हा सण साजरा करायला तितकासा वेळ मिळणार नाहीये. पण आम्ही दरवर्षी या सणाला खूप मजा मस्ती करतो. आम्ही पतंग उडवण्यासाठी एकत्र जमतो आणि स्वादिष्ट पदार्थांवर ताव मारतो. तिळगूळ तर माझा आवडता पदार्थ आहे. आम्ही घरीच तीळाचे लाडू बनवतो आणि सर्वांना वाटतो. शांती आणि समृद्धीचा तसेच नवीन प्रारंभाचा हा सण आहे. या सणाला पतंग उडवण्याचा अनुभव खूपच छान आणि वेगळा असतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण दर वर्षी मी या सणाला पतंग उडवते. अनेक वर्षं मी पतंग उडवत असल्याने आता तर मी त्यात पटाईत देखील झाले आहे. या सणाची सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असे मला कोणी सांगितले तर मी आवर्जून सांगेन की, आकाशात उडणारे सुंदर आणि रंगीबेरंगी पतंग पाहणे. या पतंगांमुळे एक वेगळेच आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते असे मला वाटते. 

Also Read : रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेमुळे रोहित सुचंतीची ही भीती झाली दूर

Web Title: We will share the relationship on the occasion of Makar Sankranta, we shared a new fame with the bright light Waingankar's Secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.