हम पाचचा तिसरा सिझन लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 12:30 IST2017-04-29T07:00:27+5:302017-04-29T12:30:27+5:30

हम पाच या कार्यक्रमाने नव्वदीच्या दशकात धुमाकूळ घातला होता. पाच मुली आणि त्यांच्या आई-वडिलांची धमाल मजा मस्ती या मालिकेत ...

We will be the third season of the fifth soon | हम पाचचा तिसरा सिझन लवकरच

हम पाचचा तिसरा सिझन लवकरच

पाच या कार्यक्रमाने नव्वदीच्या दशकात धुमाकूळ घातला होता. पाच मुली आणि त्यांच्या आई-वडिलांची धमाल मजा मस्ती या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या मालिकेतील मिनाक्षी, राधिका, काजल, स्वीटी, छोटी, आनंद माथुर, बीना माथुर, भुतणी, पूजा आंटी या सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत वंदना पाठक, विद्या बालन, भैरवी रायचुरा, राखी विजन, प्रियांका मेहरा, अशोक सराफ, शोमा आनंद, प्रिया तेंडुलकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. दुसऱ्या सिझनध्ये विद्या बालन, प्रिया तेंडुलकर आणि प्रियांका मेहरा यांच्याऐवजी पॅमेला मुखर्जी, सुधा चंद्रन आणि पुष्टी शक्ती असे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.
आता हम पाच या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत असून हम पाच फिर से असे या मालिकेचे नाव असणार आहे. हम पाच या मालिकेची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी टेलिफ्लिम्सने केली होती. पण आता बालाजीऐवजी एक नवे प्रोडक्शन हाऊस या कार्यक्रमाची निर्मिती करणार आहे. डान्स इंडिया डान्स आणि महारक्षक देवी या कार्यक्रमाची निर्मिती ज्या प्रोडक्शन हाऊसची होती, ते प्रोडक्शन हाऊस ही मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा या तशाच असणार आहेत. केवळ त्याला आधुनिकतेची जोड देण्यात येणार आहे. पण या मालिकेत तेच कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत. प्रोडक्शन हाऊस सध्या अनेक नव्या चेहऱ्यांच्या शोधात असून अनेक नवीन चेहरे प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहेत. 

hum paanch season 1
 

Web Title: We will be the third season of the fifth soon