n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">बिग बॉस या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला अभिनेता अश्मित पटेल एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ही मालिका लवकरच लीप घेणार असल्यामुळे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी उर्वषी शर्माने नुकताच या मालिकेला रामराम ठोकला. ही मालिका आता पंधरा वर्षांचा लीप घेणार असून अश्मित फैजलची भूमिका साकारणार आहे. फैजल अम्माचा मानसपूत्र असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले होते. या मालिकेत मुलींच्या मागे फिरणाऱ्या एका टपोरी मुलाची भूमिका अश्मित साकारणार आहे.