पाहा टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीचा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 14:37 IST2017-05-08T09:07:23+5:302017-05-08T14:37:23+5:30

अशाच एका पोहण्याच्या स्पर्धेच्यावेळी पूजा आणि संदीप यांची ओळख झाली. ते दोघे अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. पूजा ही नागपूरची आहे तर संदीप हा दिल्लीचा आहे.

Watch TV actress Pooja Banerjee's Wedding Album | पाहा टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीचा वेडिंग अल्बम

पाहा टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीचा वेडिंग अल्बम

ल्याच वर्षी टीव्ही अभिनेत्री  पूजा बॅनर्जीने  खेळाडू संदीप जैसवालसह साखरपुडा केला होता. त्यावेळी 2017मध्ये आम्ही दोघेही लग्न करणार असल्याचे पूजाने सांगितले होते.त्यानुसार  28 फेब्रुवारी 2017 ला हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.आता लग्नाच्या दोन महिन्यानंतर पूजाने तिच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अगदी पारंपारिक पध्दतीने पार पडलेल्या लग्नात तिचे कुटुंबियासंह इंडस्ट्रीतील मित्र मंडळींनीही हजेरी लावली होती. लग्नात परिधान केलेल्या पारंपरिक लेहंगात पूजा खूपच सुंदर दिसतेय. संदीप खेळाडू असून त्याने आशियाई क्रिडा स्पर्धेत पदकदेखील मिळवले आहे. पूजा अभिनेत्री असण्यासोबत एक खूप चांगली स्विमर आहे. तिने अनेक पोहण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. अशाच एका पोहण्याच्या स्पर्धेच्यावेळी पूजा आणि संदीप यांची ओळख झाली. ते दोघे अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. पूजा ही नागपूरची आहे तर संदीप हा दिल्लीचा आहे.

 
आता लवकरच पूजा '​हर मर्द का दर्द' मालिकेत एंट्री करणार आहे.या भूमिकेविषयी पूजा सांगते, मला या मालिकेतील भूमिका प्रचंड आवडली. मी या मालिकेत एका खट्याळ मुलीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी माझ्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. सध्या या मालिकेच्या निर्मात्यांसोबत या भूमिकेबाबत माझी चर्चा सुरू असून या मालिकेत माझा लूक कसा असावा याबाबत आम्ही विचार करत आहोत. मी या मालिकेच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणार आहे. या मालिकेत मी एका खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. मी माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अशाप्रकारची भूमिका साकारत असून ही भूमिका माझ्या चाहत्यांना आवडेल याची मला खात्री आहे. 

Web Title: Watch TV actress Pooja Banerjee's Wedding Album