हिना खान दुसऱ्यांदा पडली प्रेमात, सोशल मीडियावर तिनेच केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 11:17 IST2021-01-20T11:17:07+5:302021-01-20T11:17:32+5:30

सोशल मीडियावर हिना खान नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.

Watch hina khan love for the second time in this video | हिना खान दुसऱ्यांदा पडली प्रेमात, सोशल मीडियावर तिनेच केला हा खुलासा

हिना खान दुसऱ्यांदा पडली प्रेमात, सोशल मीडियावर तिनेच केला हा खुलासा

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान आजकाल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर हिना खान नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. अलीकडेच तिने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती सांगते आहे की, ती दुसऱ्यांदा  प्रेमात पडली आहे. या व्हिडिओमुळे हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. व्हिडिओमध्ये हिना खान 'दूजी वार प्यार' या प्रसिद्ध पंजाबी गाण्यावर अदा दाखवताना दिसते आहे.

. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हिना पंजाबी गाण्यावर 'दुजी वार प्यार' या गाण्यावर अभिनय करताना दिसते आहे. व्हिडिओमध्ये हिनाने ब्लू सूट परिधान केला आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि ते जोरदार कमेंट करतायेत. इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत.

हिना ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. हिना खानने बॉलिवूडमध्ये हॅक्ड चित्रपटातून पदार्पण केले आहे. हिना खान काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस 14’मध्ये दिसली होती.‘बिग बॉस 14’मध्ये दोन आठवडे राहण्यासाठी हिना खानला तगडी रक्कम मिळाली होती.
 

Web Title: Watch hina khan love for the second time in this video