​शानच्या टीममधील फरहान सबिर ठरला व्हॉइज इंडियाचा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2017 10:47 AM2017-03-14T10:47:07+5:302017-03-14T16:17:07+5:30

व्हॉइज इंडियामधील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज एकापेक्षा एक सरस असल्याने कोण जिंकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. या कार्यक्रमाचा ग्रँड ...

Voices India is the winner of Sharan's team | ​शानच्या टीममधील फरहान सबिर ठरला व्हॉइज इंडियाचा विजेता

​शानच्या टीममधील फरहान सबिर ठरला व्हॉइज इंडियाचा विजेता

googlenewsNext
हॉइज इंडियामधील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज एकापेक्षा एक सरस असल्याने कोण जिंकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले नुकताच झाला आणि या कार्यक्रमात फरहान सबिरने नुकतीच बाजी मारली. फरहान हा शानच्या टीममधील होता. 
या कार्यक्रमाच्या अंतिम चार स्पर्धकांमध्ये नियम कनुन्गो, परखजीत सिंग, फरहान सबीर आणि रसिका बोरकरची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेला अनुष्का शर्माने हजेरी लावली होती. तसेच मिका सिंग आणि मास्टर सलीम यांनीदेखील या कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करत कार्यक्रमाला चार चाँद लावले. या कार्यक्रमाच्या परीक्षकांनीही अफतालून परफॉर्मन्स यात सादर केले. फरहान हा अतिशय गरीब घराण्यातून आलेला आहे. फरहान दहावीत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घर चालवण्यासाठी त्याने दहावीत असतानाच शिक्षण सोडले आणि तो दिल्लीतील एका कॅफेमध्ये गायला लागला. फरहान सांगतो, "विजेता ठरल्यानंतर मी काय प्रतिक्रिया देऊ हेच मला कळत नाहीये. माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. संगीत क्षेत्रात माझे नाव कमवण्यासाठी मी अधिकाधिक मेहनत घेणार आहे. व्हॉइस इंडियाने मला जी संधी दिली, त्यासाठी मी या कार्यक्रमाचा आभारी आहे. मला या कार्यक्रमामुळे एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि माझे टायलेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमामुळे मला खूप काही शिकता आले. तसेच प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे." 
नवी दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरात फरहान राहतो. तो गाण्यासोबतच उत्कृष्ट तबला वाजवतो. त्याच्या विजयामुळे त्याचा कोच शानददेखील खूपच खूश आहे. तो सांगतो, "फरहानचा आतापर्यंतचा प्रवास खूपच चांगला राहिला आहे. या कार्यक्रमामुळे मलादेखील खूप काही शिकता आले. मी या कार्यक्रमाच्या खूप आठवणी घेऊन जाणार आहे. कोच म्हणून माझी कामगिरी या कार्यक्रमापुरताच नव्हती. भविष्यातही कोणत्याही स्पर्धकाला माझ्याकडून काही शिकायचे असल्यास त्यांचे स्वागतच असेल." 

Web Title: Voices India is the winner of Sharan's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.