​दृष्टी धामीने साजरा केला वाढदिवस परदेस मैं हे मेरा दिलच्या सेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 15:17 IST2017-01-10T15:17:49+5:302017-01-10T15:17:49+5:30

दृष्टी धामीचे गेले वर्षं खूपच चांगले गेले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. इस्टर्न आयने केलेल्या पोल सर्वेक्षणात २०१६ ...

Vision Dhamini celebrated birthday, Pardes I am on my heart set | ​दृष्टी धामीने साजरा केला वाढदिवस परदेस मैं हे मेरा दिलच्या सेटवर

​दृष्टी धामीने साजरा केला वाढदिवस परदेस मैं हे मेरा दिलच्या सेटवर

ष्टी धामीचे गेले वर्षं खूपच चांगले गेले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. इस्टर्न आयने केलेल्या पोल सर्वेक्षणात २०१६ या वर्षीच्या सेक्सिएस्ट एशियन वूमनच्या यादीत दृष्टी धामीने चौथ्या क्रमांकावर आपले स्थान बनवले. या यादीत दीपिका पादुकोण पहिल्या तर प्रियांका चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर होत्या. कतरिना कैफ, अलिया भट्ट यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्रींना मागे टाकत टिव्ही अभिनेत्री निया शर्माने तिसरा आणि दृष्टीने चौथा क्रमांक पटकावला. दृष्टीसाठी हे खूपच मोठे यश आहे. 
दृष्टीने नुकतेच 31व्या वर्षात पदार्पण केले. तिने हा वाढदिवस खूपच चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केला. सध्या परदेस में है मेरा दिल या मालिकेत ती नैना ही व्यक्तिरेखा साकारत आहे. दृष्टीची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे. दृष्टीने यंदाचा वाढदिवस याच मालिकेच्या सेटवर साजरा केला. तिला वाढदिवसाच्या निमित्ताने तिचे फॅन्स, मालिकेची टीम यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि गिफ्ट मिळाले. त्याचसोबत तिचा पती नीरज खेमकानेदेखील तिच्यासाठी खास प्लानिंग केले. 
दृष्टीने तिच्या वाढदिवसासाठी परदेस में है मेरा दिल या मालिकेच्या चित्रीकरणातून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती. तिने तिचा वाढदिवस तिच्या परिवारासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत साजरा केला. तसेच तिच्या मालिकेच्या टीमनेदेखील तिचा वाढदिवस खूप चांगला सेलिब्रेट केला. त्यांनी तिला वाढदिवसाचे खूपच चांगले सरप्राईज दिले. सेटवर तिच्यासाठी अनेक केक आणि कार्टूनच्या कॅप मागवण्यात आल्या होत्या. एखाद्या लहान मुलाप्रमाणे या कॅप्स घालून दृष्टीने तिच्या वाढदिवसाचा केक कापला. 




Web Title: Vision Dhamini celebrated birthday, Pardes I am on my heart set