“तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये”, विशाल निकमने सुनावली मीनलला खरी खोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 13:42 IST2021-11-03T13:41:27+5:302021-11-03T13:42:06+5:30

बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवलेल्या “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे सदस्यांमध्ये बरेच वादविवाद, ओढाताण झाली. या कार्याच्या संचालिका मीनल आणि मीरामध्ये देखील बरेच वाद झाले.

Vishal Nikam shouts over Minal Shaha, she's he doesn't trust her anymore, check why so | “तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये”, विशाल निकमने सुनावली मीनलला खरी खोटी

“तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये”, विशाल निकमने सुनावली मीनलला खरी खोटी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवलेल्या “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे सदस्यांमध्ये बरेच वादविवाद, ओढाताण झाली. या कार्याच्या संचालिका मीनल आणि मीरामध्ये देखील बरेच वाद झाले. आज सदस्यांमधील हे भांडण आणि धक्काबुक्की वेगळ्याच टोकाला जाणार आहे. कार्या दरम्यानचे राडे संपायचे नावचं घेत नाहीये असे दिसून येतं आहे. याच टास्कमुळे आज मीनल आणि विशालमध्ये देखील भांडण होणार आहे. कोण आहे फेअर आणि कोण आहे अनफेअर यावरून दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली. दिवसेंदिवस घरातील समीकरण, नाती बदलताना दिसत आहेत. नक्की कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगणे कठीण झाले आहे.
 
मीनल याचबाबतीत बोलायला आणि तिचा मुद्दा मांडायला विशालकडे गेली असता विशालचा कुठेतरी मीनलच्या सांगण्यावर अजिबात विश्वास नाहीये असे दिसून आले. मीनल विशालला म्हणाली, जेव्हा पहिला टास्क होता ना जेवढे पण होते बॉक्स तू ओरडत होता ते सगळे ओरडत होते माझं म्हणण काय होतं जे बरोबर आहे ते बरोबर आहे झाला ना योग्य तो निर्णय. त्यावर तृप्ती देसाई म्हणाल्या आमचे चेपलेले बॉक्स का रिजेक्ट केले पहिल्या फेरीत ? त्यावर मीनल म्हणाली मी विशालशी बोलते आहे. मी दोन क्रायटेरिया ठेवले होते जे ओले होते पहिले ते काढले नंतर दोन वरती होते ते काढले. 

मी चेपलेले बॉक्स नाही काढले. त्यावर विशाल मीनलला म्हणाला तूच काढले चेपलेले बॉक्स. त्यावर मीनल त्याला वारंवार सांगायचा प्रयत्न करत होती मी नाही काढले. तुम्ही अनफेअर खेळताय. माझ्यावर विश्वास नाही का तुमचा ? असं बोलाच विशालनेह थेट विश्वास नाही म्हणून सांगून टाकले. आता टास्कमध्ये काय होते ? कोणाचं म्हणण खरं ठरतं ? मीनल तिचा मुद्दा पटवून देऊ शकेल ? या सगळ्या घडामोडी पाहणे नक्कीच रंजक असणार आहे. 

Web Title: Vishal Nikam shouts over Minal Shaha, she's he doesn't trust her anymore, check why so