'माझा होशील ना' मालिकेविषयी आदित्यने सांगितली धक्कादायक माहिती,जाणून घ्या काय म्हणाला विराजस कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 13:03 IST2021-08-09T13:01:49+5:302021-08-09T13:03:57+5:30

छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस', 'अग्गबाई सूनबाई', 'पाहिले न मी तुला', 'कारभारी लयभारी' या मालिका देखील रसिकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले होते.

Virajas Kulkarni's shocking hint about serial Majha Hoshil Na end, video went viral | 'माझा होशील ना' मालिकेविषयी आदित्यने सांगितली धक्कादायक माहिती,जाणून घ्या काय म्हणाला विराजस कुलकर्णी

'माझा होशील ना' मालिकेविषयी आदित्यने सांगितली धक्कादायक माहिती,जाणून घ्या काय म्हणाला विराजस कुलकर्णी

लवकरच जुन्या मालिका रसिकांचा निरोप घेत नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहेत. नवीन मालिका पाहण्याचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन मालिकेचे प्रोमोही टीव्हीवर झळकू लागले आहेत. त्यामुळे जुन्या मालिका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काहीच दिवस रसिकांना त्यांच्या जुन्या मालिका पाहयाल मिळणार आहेत. 

यात 'माझा होशील ना मालिका'ही  रसिकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.रसिकांची ही आवडती मालिका आहे. त्यामुळे मालिकेने निरोप घेणे रसिकांसाठी कोणत्याही झटक्यापेक्षा कमी नसेल. मालिकेला सुरुवातीपासूनच रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.नवीन कथानक, नवीन कलाकारांना रसिकांची अल्पावधीतच पसंती मिळवली होती. मालिकेतले कलाकार रसिकांचे आवडते कलाकार बनले. मालिकेचा शेवट कसा होणार ? याविषयी नवीन माहिती समोर आली आहे. खुद्द आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णीने चाहत्यांना मालिकेचा शेवट कसा होणार ? याविषयी सांगितले आहे. 

विराजसने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मालिकेचा शेवट कसा होणार याविषयी  त्याने संकेत दिले आहेत. मालिकेत आदित्य हा आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक झाल्यानंतर मालिका संपू शकते असे आदित्यने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. कोणत्याही मालिकेची एक कथा असते, आणि मग ती पूर्ण झाल्या नंतर मालिका खेचण्यात पण काही अर्थ नसतो, त्यामुळे कथा संपली की मालिकाही संपली असे विराजसने सांगितले आहे. 

त्याच्या या व्हिडीओवरुन पहिल्यांदाच बंद होणा-या मालिकेत 'माझा होशील ना' मालिकाही असल्याचेही समोर आले आहे. छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस', 'अग्गबाई सूनबाई', 'पाहिले न मी तुला', 'कारभारी लयभारी' या मालिका देखील रसिकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सध्या या मालिका चर्चेत आहेत.

“येऊ कशी तशी मी नांदायला” ही एकच मालिका पुढे चालू राहणार की संपणार याविषयी माहिती समोर आलेली नाही. 'माझा होशील ना' मालिकेच्या पुढच्या काही भागात रसिकांना साऱ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील. तुर्तास 'माझा होशील ना' मालिका बंद होणार हे चाहत्यांसाठी नक्कीच निराशाजनक असणार हे मात्र नक्की.

Web Title: Virajas Kulkarni's shocking hint about serial Majha Hoshil Na end, video went viral