विकास खन्ना परतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 15:01 IST2016-08-13T10:21:25+5:302016-09-24T15:01:14+5:30
मास्टरशेफ इंडिया हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात परीक्षकाची ...
.jpg)
विकास खन्ना परतला
म स्टरशेफ इंडिया हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यंदाच्या सिझनमध्ये विकास खन्ना, कुणाल कपूर आणि झोरावर कलरा परीक्षकाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा आहे. विकासने मास्टरशेफच्या सुरुवातीच्या सिझनमध्ये परीक्षकाची भूमिका साकारली होती. नंतरच्या काही सिझनमध्ये तो काही भागांमध्येच झळकला होता. पण या सिझनला तो सगळ्याच भागांमध्ये असणार असून शेफ कुणाल कपूर त्याला साथ देणार आहे. कुणालनेही याआधी मास्टरशेफमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे तर झोरावर पहिल्यांदाच या कार्यक्रमाचा भाग बनणार आहे.