प्रत्युषाच्या कपाळावर सिंदूर होतं - राखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 15:21 IST2016-04-02T22:21:49+5:302016-04-02T15:21:49+5:30
‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. प्रत्युषाच्या मृत्यून ...

प्रत्युषाच्या कपाळावर सिंदूर होतं - राखी
‘ ालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. प्रत्युषाच्या मृत्यून तिच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. प्रत्युषाच्या मृत्यूबाबत माहिती मिळाल्यानंतर अभिनेत्री राखी सावंतही काल तिच्या घरी गेली होती. त्यानंतर बोलताना राखी म्हणाली की, ‘‘प्रत्युषाचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर भरलं होतं. मला विश्वासच बसत नाही. होळीच्या पार्टीत आम्ही एकत्रच होतो. तिचा मृतदेह पाहून मला धक्काच बसला. तिच्या गळ्यावर काही निशाण आहेत. तर तिचे ओठही काळे पडले होते. एवढ्या सुंदर मुलीला मी या अवस्थेत पाहूच शकत नाही.’’ प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल रॉय हाच प्रत्युषाचा मृतदेह घेऊन रु ग्णालयात गेला होता. मात्र, त्यानंतर तो तिथून गायब झाला होता. त्याच्याबद्दल बोलताना राखी सावंत म्हणाली की, ‘‘बॉयफ्रेंड राहुल राज तिचा मोबाइलही घेऊन पळाला आहे. ज्यामध्ये बरेच रेकॉर्डिंग आण िइतर गोष्टी असतील. ज्या तो नक्कीच डिलीट करेल. तिच्या मृत्यूनंतर तिचा बॉयफ्रेंड बाहेर चिप्स खात बसला होता. हे फारच धक्कादायक आहे.