'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत लगीनघाई, वसू-आकाशचा संगीत सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 13:04 IST2024-05-31T13:04:22+5:302024-05-31T13:04:41+5:30

Punha Kartavya Aahe : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसू-आकाशच्या लग्न कार्याला सुरुवात झाली आहे, पहिला सोहळा आहे संगीताचा, ज्यात वर आणि वधू पिवळ्या रंगाच्या पेहेरावात तयार झाले आहेत.

Vasu And Aakash Wedding ceremony in Punha Kartavya Aahe | 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत लगीनघाई, वसू-आकाशचा संगीत सोहळा

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत लगीनघाई, वसू-आकाशचा संगीत सोहळा

छोट्या पडद्यावर नुकतीच पुन्हा कर्तव्य आहे (Punha Kartavya Aahe) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे ही मालिका सुरु झाल्यापासून मालिकेतील काही रंजक किस्से प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. यातील वसू आणि आकाशने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. दरम्यान आता मालिकेत लगीनघाई पाहायला मिळणार आहे.  

झी मराठीवर लग्न सराई विशेष भाग सुरु आहेत. त्यात 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसू-आकाशच्या लग्न कार्याला सुरुवात झाली आहे, पहिला सोहळा आहे संगीताचा, ज्यात वर आणि वधू पिवळ्या रंगाच्या पेहेरावात तयार झाले आहेत. या संगीत सोहळ्यात त्यांना साथ देत आहे चिनू, मिनू आणि बनी जे आपल्या आई-बाबां प्रमाणेच तयार झाले आहेत. चिनू-मनू जरीही आपल्या बाबाच्या लग्नात खुश नसल्या तरीही तयार होण्याची संधी त्यांनी ही शोधली नाही. 

वसुंधरा जरी ही उदास दिसत असली तरी तिचा तो पिवळ्या रंगाच्या लेहेंगा आणि तिची सुंदर हेअरस्टाईलने तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. संगीतमध्ये वसू-आकाशचा  एक खास डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळेल. इतकेच नाही तर घरात ले लहान- मोठे सर्वच आपल्या नृत्याची एक झलक या संगीत सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. पण इथेही तानियाने  गोंधळ घातला आहे. आता तानियाने घातलेला गोंधळ वसू-आकाशच्या लग्न कार्यात मीठचा खडा टाकेल का? वसू-आकाशचा संगीत सोहळा 'पुन्हा कर्तव्य आहे'च्या लग्न सराई विशेष भागात रात्री ९.३० वाजता फक्त झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

Web Title: Vasu And Aakash Wedding ceremony in Punha Kartavya Aahe