वरुण धवन का म्हणतोय ‘भाभीजी घर पर है’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 15:50 IST2017-09-19T10:18:27+5:302017-09-19T15:50:15+5:30
'भाभीजी घर पर है' या मालिकेत शाहरुख खान, सलमान खान, सनी लिओनी, बिपाशा बासु असे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सिनेमाच्या ...
वरुण धवन का म्हणतोय ‘भाभीजी घर पर है’
' ;भाभीजी घर पर है' या मालिकेत शाहरुख खान, सलमान खान, सनी लिओनी, बिपाशा बासु असे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावत असतात.आता वरुण धवनही या मालिकेच्या सेटवर पोहचला.त्याला कारणही तसे खास आहे 'जुडवा 2' सिनेमाच्या प्रमोशनसाठी वरूणने या मालिकेच्या सेटला भेट दिली होती.यावेळी सुरूवातीलाच त्याची भेट अनिता भाभी म्हणजे सौम्या टंडनसह झाली आणि त्यात दोघांनी सिनेमाविषयी खूप चर्चाही केली. वरूणच्या आवडी-निवडीही यावेळी अनिता भाभीने जाणून घेतल्या.वरुणने 'भाभीजी घर पर है' या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदाच हजेरी लावली असे नाही. यापूर्वीही 'बद्रीनाथ की दुल्हनियाँ' सिनेमावेळी वरूण धवन भाभीजी घर पर है मालिकेच्या सेटवर धम्माल मस्ती केल्याचे पाहायला मिळाले होते.त्यावेळी सिनेमाच्या टीमसह मालिकेच्या टीमने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले होते.आता पुन्हा एकदा वरूण धवन भाभीजीच्या सेटवर धम्माल मस्ती करताना पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या सेटवर प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रेटीला अंगुरी भाभीला भेटण्याची इच्छा असते. अंगुरी भाभी हे या मालिकेतील लोकप्रिय कॅरेक्टर आहे. यावेळी वरूण धवनने मालिकेच्या टीमसह जुडवा 2 सिनेमातील काही गाण्यांवर ठेकाही धरल्याचे पाहायला मिळणार आहे.त्यामुळे 'भाभीजी घर पर है' मालिकेत आगामी काळात मनोरंजनाचा आणि हास्याचा मसाला असणार आहे.
Alsor Read:कोण आहे शुभांगीची नवी हेअरस्टायलिस्ट?
cnxoldfiles/a>सिनेमाचा सिक्वेल असलेल्या या सिनेमाबाबत रसिकांमध्येही उत्सुकता आहे. त्यामुळे या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. त्यामुळेच जॅकलिननं सलमानसह थिरकत सिनेमाचं एकप्रकारे प्रमोशनच केले आहे. जॅकलिनच नाहीतर वरुणही ओरिजनल जुडवाँ स्टारकास्टसह प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी वरुण आणि करिष्मा कपूर जुडवाँ सिनेमाच्या गाण्यावर थिरकताना दिसले होते. त्यानंतर वरुण आणि करिष्माचा हा व्हिडीओही व्हायरल झाला होता. सध्या जुडवाँ-2 या सिनेमाच्या गाण्यांनी रसिकांना वेड लावले आहे. या सिनेमातील टना टना टन आणि ऊँची है बिल्डिंग या गाण्यांचं नवं वर्जन रसिकांना चांगलंच भावतंय. त्यामुळे जुडवाँ-2 सिनेमाचं प्रमोशन करण्यात सिनेमाची टीम कोणतीही कसर सोडत नसल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत आहे.