विकीशाच्या लग्नानंतर 'वर्तुळ' मालिकेतही रंगणार शाही लग्नसोहळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 07:15 IST2019-02-06T07:15:00+5:302019-02-06T07:15:00+5:30

रेशीमगाठीत बांधले गेलेल्या लग्नाच्या ट्रॅकने आपापाल्या मालिकेमध्ये एक रंजक वळण दिले. विकाशीच्या लग्ना पाठोपाठ आता आणखीन एका ऑनस्क्रीन लग्नसोहळ्याची तयारी सुरू झाली आहे.

Vartul Mathi Serial Wedding Track Coming Soon | विकीशाच्या लग्नानंतर 'वर्तुळ' मालिकेतही रंगणार शाही लग्नसोहळा !

विकीशाच्या लग्नानंतर 'वर्तुळ' मालिकेतही रंगणार शाही लग्नसोहळा !

सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. रिअल लाईफप्रमाणे रिल लाईफमध्ये रंगणा-या विवहसोहळेही हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच सगळ्यांनी विकिशा म्हणजेच 'तुला पाहते रे' मालिकेतील विक्रांत आणि ईशाच्या शाही लग्नसोहळ्याचीही धूम रसिकांनी अनुभवली. रेशीमगाठीत बांधले गेलेल्या लग्नाच्या ट्रॅकने आपापाल्या मालिकेमध्ये एक रंजक वळण दिले. विकाशीच्या लग्ना पाठोपाठ आता आणखीन एका ऑनस्क्रीन लग्नसोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. 'वर्तुळ' मालिकेत मीनाक्षी आणि अभिजीतचा लग्नसोहळाही खास ठरणार आहे. त्यामुळे रिअल लाईफप्रमाणे रिल लाईफमध्येही लग्नसराई सुरू झाल्याचे पाहायला मिळतंय.

छोट्या पडद्यावरील  'वर्तुळ' ही नवी मालिका नावाप्रमाणेच ही मालिका माणसाच्या आयुष्याचं वर्तुळ दर्शवणारी आहे. विकास पाटील विजय आंदळकर आणि जुही गडकरी यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स स्टोरी आहे. मालिकेचं कथानक अगदी रंजक असून, ही कथा मीनाक्षी नावाच्या एका अनाथ मुलीची आहे जिचा भूतकाळ तिच्या भविष्यकाळात डोकावतोय. जुई गडकरी बऱ्याच काळानंतर एका तगड्या भूमिकेद्वारे या मालिकेद्वारे  प्रेक्षकांच्या भेटीस आली. जुई मीनाक्षीची  या पात्राची भूमिका साकारत आहे. तर अभिजित परांजपे म्हणजे अभिनेता विकास पाटील हा कथेचा नायक आहे. मिनाक्षी आणि अभिजितची भेट अपघाताने होते.  अभिजित मीनाक्षीला स्वतःच्या घरी घेऊन जातो. कालांतरानें त्या दोघांमध्ये प्रेम होते आणि आता येत्या रविवारी १० फेब्रुवारीला रात्री ९ वाजता वर्तुळ या मालिकेचा महा एपिसोड दाखवला जाणार आहे . ही मालिका आता आणखीन रंजक वळणावर पोहचली असून  यात मीनाक्षी आणि अभिजीतचे लग्न मोठ्या थाटामाटामध्ये रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. या लग्नात हळदी , संगीत सगळंच असणार आहे. या लग्नात फुलपाखरूचे कलाकार त्याचप्रमाणे सूर राहू दे चे कलाकार सुद्धा नवजोड्याला शुभेच्छा द्यायला येतील . फुलपाखरू मधील मानस या संगीत मध्ये एक सुंदर गाणं गाणार आहे .

 

तसं पाहता पहिला  मीनाक्षीने तिच्या भूतकाळातील काही गोष्टी तिच्या मनात दडवून ठेवल्या होत्या मात्र आता तिने तीच आयुष्य मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून अभिजीत ला पाठवले आहे . पण अजूनही अभिजीत ने तो ऑडिओ ऐकला नाही आहे . या लग्नात काही भयंकर घडेल का ?  तिचा भूतकाळ तिच्यासमोर येईल का ?  अभिजीत सोबत निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याला मिनाक्षीच्या भूतकाळाने तडा जाणार का? त्यांचं नातं टिकून राहणार का? असे असंख्य प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहेत. तुर्तास वर्तूळ मधील या लग्नसराईचा आनंद रसिकांसाठी रंजक ठरणार आहे. 

Web Title: Vartul Mathi Serial Wedding Track Coming Soon