Video: गोविंदाच्या गाण्यावर 'हास्यजत्रा'चे वनिता-श्रमेश असे थिरकले की नजर हटणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 03:21 PM2024-06-19T15:21:23+5:302024-06-19T15:22:46+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील वनिता खरात - श्रमेश बेटकरचा गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल झालाय (vanita kharat, maharashtrachi hasyajatra)

Vanita kharat and shramesh betkar dance on Govinda song Angna Mein Baba Duaare Pe Maa | Video: गोविंदाच्या गाण्यावर 'हास्यजत्रा'चे वनिता-श्रमेश असे थिरकले की नजर हटणार नाही

Video: गोविंदाच्या गाण्यावर 'हास्यजत्रा'चे वनिता-श्रमेश असे थिरकले की नजर हटणार नाही

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा आवडीचा शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक प्रेम करतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकार ऑनस्क्रीन आपल्याला खळखळून हसवताना दिसतात. याशिवाय हेच कलाकार ऑफस्क्रीनसुद्धा धमाल करताना दिसतात. याचा अनुभव याआधी आपण विविध व्हि़डीओमधून घेतलाय. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटबाहेरील एक नवीन व्हिडीओ समोर आलाय. यात वनिता खरात आणि श्रमेश बेटकर गोविंदाच्या गाण्यावर धमाल नाचताना दिसत आहेत.

 श्रमेश - वनिताचा जबरदस्त नृत्याविष्कार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या सेटबाहेर श्रमेश-वनिताचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत पाहायला मिळतं की, दोघांनीही गोविंदाच्या गाण्यावर डान्स केलाय. 'अंगना में बाबा..' असं या गाण्याचं नाव असून श्रमेश - वनिता भन्नाट थिरकले आहेत. वनिताने मूळ गाण्यात शिल्पा शिरोडकरने जो लूक केला होता तसाच मिळताजुळता लूक परिधान केलेला दिसतोय. सर्वांना हसवणाऱ्या श्रमेशला असं नाचताना बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

 

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

या दोघांच्या डान्सवर अनेकांनी कमेंट करत पसंती दर्शवली आहे. अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत श्रमेश-वनिताच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केलाय. याशिवाय एका युजरने "नुसता जाळ अन् धूर" अशी कमेंट केली आहे. आणखी एका युजरने कमेंट केलीय की, "क्या बात है श्रमेश.. असेच रील्स आम्हाला अजून हवेत.. तुला नाचताना पाहून एकदम खूश होतं मन.. आमची विनंती आहे ती असेच डान्स व्हिडीओ अपलोड करत राहा." सध्या श्रमेश-वनिता दोघेही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून लोकांना खळखळून हसवत आहेत.

Web Title: Vanita kharat and shramesh betkar dance on Govinda song Angna Mein Baba Duaare Pe Maa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.